01:34am | Jun 24, 2019 |
सातारा : शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्याकरीता सुपारी देणारा मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या अमीर खान याचा अटकपूर्व व हल्लेखोर दोघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला आहे. यावेळी फरार मुख्य सूत्रधाराला व इतर फरार हल्लेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीसांपुढे उभे आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील पत्रकार मुराद पटेल हे 11 एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना एका वीटभट्टीलगत दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सत्तूर,चाकू,दगड यांच्यासह पत्रकार मुराद पटेल यांच्यावर अचानकपणे प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये पत्रकार मुराद पटेल हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने ,सातारा शहर पत्रकार संघासह विविध स्तरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली होती.
यावेळी या हल्ल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व शिरवळ पोलीसांनी केलेल्या तपासामध्ये शिरवळ येथील तडीपार गुंडाचा व जीएसटी अधिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये बातम्या दिल्याच्या कारणावरून राग मनात धरत आझाद परमिट रुम या दारू दुकानाचा चालक सद्दाम उर्फ भैय्या खान याने पुणे येथील हल्लेखोरांना पत्रकार मुराद पटेल यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. यामध्ये घटना घडल्यापासून मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला होता तर याप्रकरणी हल्लेखोरांपैकी इस्माईल मौल्लाली मकानदार (वय 25), रोहन रोहिदास पवार (वय 22 ,दोघे रा. संतोषनगर ,कात्रज पुणे ) यांना पोलीसांनी शिताफीने अटक केली होती. याप्रकरणी सध्या दोघेही कळंबा कारागृह ,कोल्हापूर याठिकाणी न्यायालयीन कोठडीत आहे.त्याचप्रमाणे हल्लखोरांपैकी मोहसीन मेहबूब मुल्ला , जावेद मेहबूब मुल्ला , शेखर ठोंबरे , शफिक अब्दुल नगराळे-शेख (सर्व रा. संतोषनगर ,कात्रज,पुणे) हे चार हल्लेखोर घटनेपासून अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलीसांकडून सुरु आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याने सातारा जिल्हा न्यायालयातून 29 मे रोजी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला होता. यावेळी सद्दाम उर्फ भैय्या खान याने याप्रकरणी अंतरिम जामीन मिळविण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी होत जिल्हा सरकारी वकील यांनी सद्दाम उर्फ भैय्या खान याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला व हल्लेखोर इस्माईल मकानदार व रोहन पवार यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करत पुरावे व युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केले. यावेळी सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त सातारा जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांनी मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याचा अटकपूर्व जामीन अर्ज व अटकेत असलेले हल्लेखोर इस्माईल मकानदार व रोहन पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुख्य सूत्रधार आझाद परमिट रूम चालक सद्दाम उर्फ भैय्या खान हा फरार झाला आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार सद्दाम उर्फ भैय्या खान याला व इतर फरार हल्लेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |