कराड : कृष्णा उद्योग समूहाच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून कराड शहरातील पत्रकारांचा सत्कार आज (बुधवारी) श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.अतुल भोसले म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीवर अंकुश ठेवणारा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आजच्या दिनी या घटकाचा सत्कार करणे हे मी माझे भाग्य समजतो, पत्रकारामुळे सामाजिक स्थिरता, वैचारीकता बळकट होण्यास नेहमीच मदत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आहेत. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मात्र मी त्याहीपेक्षा महत्वाचा कार्यक्रम कराडला आहे आणि मला त्या कार्यक्रमाला थांबले पाहिजे असे मी त्यांना फोनवरच सांगितले. तेव्हा मोदींच्या कार्यक्रमापेक्षा कोणता मोठा कार्यक्रम असे त्यांनी मला विचारले असता मी आज कराडमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम पूर्वनियोजीत असल्याचे मी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला लगेचच पत्रकारांच्या कार्यक्रमास तुम्ही जरूर थांबा तो महत्वाचा कार्यक्रम आहे असे सांगून मुख्यमंत्रीदेखील पत्रकारांबाबतत किती सजग आहेत हेही यातून दिसले असे यावेळी डॉ.अतुल भोसले यांनी सांगितले.
युवराज पाटील यांनी पत्रकारितेतील होणारे बदल स्वीकारण्यासह त्याचे परिणाम लक्षात घेऊन कालानुरूप ते पत्रकारांनी स्वीकारत आपल्या यापुढील कामकाजाची दिशा ठरवली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे,कृष्णा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप, प्रा. अशोक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. प्रास्ताविक आनंदराव पाटील यांनी केले. तर आभार सचिन शिंदे यांनी मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |