महाबळेश्वर : नाकिंदा, ता. महाबळेश्वर येथील ब्राईट लँड या हॉटेलच्या मालकाला अवैध उत्खनन केल्याप्रकरणी महाबळेश्वर तहसिलदार यांनी सुमारे पाच लाखांचा दंड ठोठावला असून उत्खनन तसेच बेकायदेशीर बांधकाम केलेल्या कामावर हातोडा टाकण्याचे आदेशही तहसिलदारांनी दिलेले आहेत.
याबाबत माहिती अशी की, नाकिंदा, ता. महाबळेश्वर येथे विजय सेवकरमाणी यांचे ब्राईट लँड नावाचे हॉटेल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे हॉटेल सेवारमाणी चालवित आहेत. परंतू गेल्या काही महिन्यांपासून सेवकरमाणी यांनी नाकिंदा येथील सर्व्हे नं. 3/4 क्षेत्र 34 आर मध्ये हॉटेलच्या उतारास संरक्षक भिंत तसेच हॉटेलमधील एसटीपी सांडपाणी तसेच कचरा साठविण्यासाठी याठिकाणी मोठे उत्खनन केले आहे. याचप्रमाणे याच जागेवर बेकायदेशीर बांधकामही केले आहे. याबाबत महाबळेश्वर तहसिलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार तहसिलदारांनी बेकायदेशीर उत्खनन तसेच बांधकामाबाबत पंचनामा करण्याचे आदेश मंडलाधिकार्यांना दिले होते. त्याप्रमाणे मंडलाधिकार्यांनी बेकायदेशीर बांधकाम व उत्खननाचा पंचनामा केला असता याठिकाणी 126.21 ब्रास बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. पंचनामा केल्यानंतर महाबळेश्वर तहसिलदार यांनी सुमारे सहा महिन्यानंतर ब्राईट लँड हॉटेलला याप्रकरणी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. मात्र ही संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवर्यात आली असून ब्राईट लँड हॉटेलचे मालक विजय सेवकरमाणी यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामावर महाबळेश्वर तहसिलदार हातोडा टाकणार काय, याकडेही महाबळेश्वरकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |