07:24pm | Jun 04, 2018 |
सातारा : संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे अडचणीत आलेल्या येथील जिजामाता महिला सहकारी बँकेच्यामार्फत सहकार मंत्र्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रलंबित रिव्हीजनचा निकाल 4 महिन्यात लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायूमर्ती ए. ए. सायद व न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी दिले आहेत. यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी ए. ए. अलासपूरकर व केंद्र शासनाचे प्रतिनिधी मे. जे. एन. पांधी व अनिल यादव उपस्थित होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 जून 2016 च्या आदेशान्वये जिजामाता महिला सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्याने सहकार आयुक्तांनी ही बँक अवसायानात घेतली व अवसायक म्हणून सहाय्यक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांची नियुक्ती करुन बँक ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र, बँकेच्या चेअरमन अॅड. वर्षा माडगूळकर यांनी केवळ वेळकाढूपणाच्या हेतूने सहकार आयुक्तांच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले. सहकार मंत्र्यांची दिशाभूल करत रिव्हिजन अर्ज दाखल केला व आयुक्तांच्या अवसायक नेमणुकीच्या आदेशाविरुध्द सहकार मंत्र्यांकडून एकतर्फी स्थगिती आदेश मिळवून बँकेलाच कुलूप लावले. सहकार मंत्र्यांच्या एकतर्फी आदेशामुळे ठेवीदारांना कोणीच तारणहार राहिला नाही. त्यामुळे ठेवीदार रस्त्यावर आले. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिजामाताच्या सर्व सभासद व ठेवीदारांच्या न्याय व हक्कांच्या संरक्षणसाठी स्थापन करण्यात आलेल्या शासनमान्य नोंदणीकृत ठेवीदार व कर्जदार सामाजिक संस्थेतर्फे अॅड. प्रशांत खामकर व अॅड. वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्र्यांच्या एकतर्फी स्थगिती आदेशाविरुध्द रिपपिटीशन दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी होवून बँकेच्यामार्फत सहकार मंत्र्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रलंबित रिव्हीजनचा निकाल 4 महिन्यात लावण्याचे आदेश उच्च न्यायायलयाने दिले आहेत. या आदेशामुळे बँक अवसायानाची प्रक्रिया पूर्ण होईल किंवा विलीनीकरण होण्याची प्रक्रिया अथवा बँक पुन्हा सुरु होण्यास मदत होणार असून या निर्णयामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याची माहिती ठेवीदार व कर्जदार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कदम यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |