06:40pm | Jul 25, 2018 |
सातारा : परळीतून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग साताऱ्यापर्यंत पोहोचली आहे. औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरूणाच्या जलसमाधीनंतर आंदोलनाची धार आणखीनच वाढली आहे. आज सकाळी शांततेत सुरू झालेल्या मोर्चानंतर येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलनाला गालबोट लागले. शेकडोंच्या संतप्त जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत जिल्हा पोलीस प्रमुखांसह डझनभर पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर भडकलेल्या आंदोलनाचे लोण साताऱ्यात पोहोचले आहे. आज सकाळी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा गगनभेदी घोषणा देत हजारो मराठा बांधव साताऱ्यातील गांधी मैदानावर एकवटले. त्यानंतर मराठा मोर्चाच्या संयोजकांनी जमलेल्या समुदायाला आंदोलनाची दिशा समजावली. आतापर्यंत आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. त्याच पध्दतीने हे आंदोलनही आपल्याला शांततामय मार्गानेच करायचे आहे. आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू न देता आपल्याला सरकारकडून आरक्षण घ्यायचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
त्यानंतर तेथून मराठा समाजाचा जनसागर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. त्या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन सुरू झाले. इकडे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्गावर तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक रोखली. तसेच वाहनांच्या तोडफोडीला सुरूवात केली. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांनाच धक्काबुक्की केली. यावेळी महामार्गावर टायर पेटवून वाहतुक अडवण्यात आली होती. पोलिसांनी यावेळी संतप्त जमावाला थोपवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर हल्ला चढवल्यामुळे नाइलाजाने जमावावर लाठीचार्ज करावा लागला.
लाठीचार्ज केल्यामुळे विखुरलेला जमाव प्रक्षुब्ध झाला. यावेळी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. चारही बाजुंनी होत असलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दगडफेकीचे वृत्त समजतात जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेतली व प्रक्षुब्ध जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यादरम्यान खुद्द जिल्हा पोलीस प्रमुखांवरच दगडफेक झाली. यात ते जखमी झाले. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आली. दगडफेकीत एका पोलीस व्हॅनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच महामार्गावरून जाणारा एक कंटेनर अडवून त्याची तोडफोड करण्यात आली. प्रक्षुब्ध जमावाकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात तुफान दगडफेक सुरूच राहिल्याने सातारा पोलीस व राज्य राखीव दलाची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झाली. जमावाला पांगवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या दहा आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |