सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खंडाळा जि.सातारा येथे कार्यक्रमादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी रविवारी सायंकाळी त्याला मुंबईतून ताब्यात घेतला. सातार्यात सध्या शहर पोलिस ठाण्यात त्याला अटक दाखवण्यात आली असून लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अद्याप चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी खंडाळा येथे एका कार्यक्रमानिमित्त नियोजित दौर्यावर येणार होते. तत्पूर्वी रविवारी सकाळी 6 वाजता पंकज कुंभार (मूळ रा.मालगाव ता.सातारा हल्ली रा.पुणे) याच्या फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट पडल्याने सातारा, पुणेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. पंकज कुंभार याच्या फेसबुक अकाउंटवर ‘अजितदादा बच गया, अब सीएम खंडाला, सातारा मे मरेगा,’ अशी आशयाची खळबळ उडवून देणारी पोस्ट पडली.
मुंबईसह सातारा पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली. संबंधित फेसबुक अकाउंट चालक हा सातारा तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासामध्ये तो मुंबईत असल्याचे समजल्यानंतर दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, रविवारी दुपारी सातारा एलसीबीचे पथक मुंबईत पोहचल्यानंतर त्याला मध्यरात्री उशीरा ताब्यात घेतले. सातार्यात हे पथक सोमवारी सकाळी आल्यानंतर त्याला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याठिकाणी पंकज कुंभार याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन अटक करण्यात आली. एखाद्याकडून गुन्हा घडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यावर कारवाई करणे, याप्रमाणे ही पोलिसांनी कारवाई केली व लॉकमध्ये ठेवण्यात आले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |