03:38pm | Jan 31, 2019 |
कराड : येथील संभाजी भाजी मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील पत्रकार भवन नाममात्र भाडेतत्त्वावर वापरण्यास मिळण्याबाबत आलेल्या अर्जावर आज (बुधवारी) कराड नगरपरिषदेच्या विशेष सभेत पत्रकार भवनाच्या भाडे निश्चितीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील होते.
कराड नगरपरिषदेची विशेष सभा आज पार पडली. या सभेत पत्रकार भवन नाममात्र भाडेतत्त्वावर वापरण्यास देण्यासह दोन विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यावर बोलताना विनायक पावसकर म्हणाले, पत्रकार भवनाची जागा मोकळी राहीली तर बाधा येवू शकते. यासाठी हे भवन वापरण्यास देण्यास हरकत नाही. पत्रकार भवनाचा आधी ताबा देवू त्यानंतर शासन निर्णयाची वाट बघू असे सुचवत काही उदाहरणे दिली. त्यावर मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, पत्रकार भवनाचे भाडे निश्चिती केल्याशिवाय ताबा देता येेणार नाही. यापूर्वी काही सेवाभावी संस्थंाना अशा पद्धतीने जागा दिल्या असल्या तरी चुका सुधारल्याशिवाय हे देता येणार नाही. यावर जयवंत पाटील म्हणाले, सर्व पत्रकारांची एकमुखी मागणी येवू दया, मागच्या काही चुका झाल्या असतील त्या यापुढे करायच्या का? असा सवाल त्यांनी थेट पावसकर यांना विचारला. त्यावर पावसकर यांनी प्रथेनुसार जावू दे असे म्हणत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर पत्रकार भवनाच्या भाडे निश्चितीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव करण्यात आला.
या विषयावरील चर्चेत फारूक पटवेकर, स्मिता हुलवान, हणमंत पवार यांनी भाग घेतला. यावेळी पत्रकार भवनासाठी मान्यवरांनी निधी दिल्याचा उल्लेख आल्यानंतर फारूक पटवेकर यांनी कोण मान्यवर? त्यांची नावे सभागृहाला सांगावीत अशी मागणी केली. त्यावर स्मिता हुलवान यांनी पोटतिडकीने फारूक पटवेकर यांना कोपरखळी मारली असता. पटवेकर यांनी हुलवान यांना त्याच भाषेेत प्रतित्तूर दिले.
कृष्णा पुलापासून ते कोयना नदीवरील नवीन पुलापर्यत नदीकाठाने संरक्षक भिंत रस्ता व त्यावरील पुल बांधणे या कामासाठी शासनाकडे वाढीव अनुदान मागण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावरील चर्चेत विनायक पावसकर, सौरभ पाटील, फारूक पटवेकर, विजय वाटेगावकर यांनी सहभाग घेतला.
पत्रकार भवनासाठी टेंडर प्रक्रिया पत्रकांरानीच केली
संभाजी भाजी मार्केटमधील पत्रकार भवनासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 55 लाखाचा निधी दिला होता. या पत्रकार भवनाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. या पत्रकार भवनासाठी टेंडर प्रक्रिया पत्रकारांनीच केली होती. तसेच त्यांना ज्या पद्धतीने काम पाहिजे होते. त्या पद्धतीने त्यांनी करून घेतले आहे. असे महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी सभागृहाला सांगितले. त्यावर जयवंत पाटील यांनी हस्तक्षेप करीत हे काम नगरपालिकेच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |