सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्रीमंत यशवंत अप्पासाहेब उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे आज फलटण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात निधन झाले.
खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे श्रीमंत यशवंत अप्पासाहेब उर्फ दादाराजे खर्डेकर (वय ८१ ) यांचा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात प्रथमपासूनच दबदबा होता. फलटण तालुक्यातील पूर्व भागात असलेले आसू हे त्यांचे गाव. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती. आसू येथे त्यांची शेती आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करुन प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी साडेअकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता आसू, ता. फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच जिल्ह्याच्या राजकारणात विविध पदांवर राहिलेल्या राज घराण्यातील एका रुबाबदार व्यक्तीच्या निधनामुळे आसू सह फलटण तालुक्याच्या पूर्व भागावर शोककळा पसरली आहे. सातारा, जावली मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा होत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |