01:22am | Aug 03, 2018 |
कोरेगाव : माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील आमदार आणि जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या चेअरमन असताना सन 2003 साली साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यासाठी पंधरा वर्षापूर्वी ऊस तोडणी वाहतुकदारांच्या नावे काढलेली साधारण कोरेगाव खटाव तालुक्यातील 158 शेतकर्यांच्या आजअखेर झालेल्या एकूण 10 कोटीच्या आसपास असलेल्या कराड जनता बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयाच्या आदेशाने संबंधित ऊस वाहतुकदार शेतकर्यांच्या शेतजमिनीवर बँकेने कर्जाचे बोजे चढवण्याचे आणि शेतकर्यांच्या शेतजमिनीचे जप्ती आदेश बजावल्याने कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यात खळबळ उडाली असून या अन्यायाच्या विरोधात कोरेगाव तालुक्यातील 70 ऊस वाहतूक करणार्या कर्जबाजारी शेतकर्यांनी कोरेगाव बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेवून बँकेच्या आणि तत्कालीन साखर व्यवस्थापनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कराड जनता बँकेने कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील ऊस वाहतूकदार शेतकर्यांच्या शेतजमीनीवर थकीत कर्जाचे बोजे चढविण्याचा आणि शेतजमिनींची जप्ती करण्याचे आदेश बजावल्याच्या निषेर्धात बँकेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात संभाव्य जनआंदोलनाबाबतचे लेखी निवेदन प्रांताधिकारी कोरेगाव तहसीलदार कोरेगाव, सहाय्यक निबंधक कोरेगाव, जिल्हा उपनिबंधक सातारा यांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव खटाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2000 ते सन 2003 चा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी सुमारे पंधरा वर्षापूर्वी कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील 158 ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूकदार शेतकरी यांच्या नावे माजी महसुल मंत्री तत्कालीन साखर कारखाना चेअरमन डॉ. शालीनीताई पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने व साखर कारखाना प्रशासनाने प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे साडे तीन कोटी रुपयांचे कर्ज कराड येथील विलासराव बापू वाठारकर यांच्या कराड जनता बँकेतून उचलले होते.
सदर सर्व कर्जाची परतफेड तत्कालीन संचालक मंडळ आणि साखर कारखान्याचे तत्कालीन व्यवस्थापक करेल अशी लेखी हमी त्यावेळी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने कराड जनता बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापनाला दिली होती. मात्र ऊस वाहतूक करणार्या शेतकर्यांच्या नावे काढल्याली आणि जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन व्यवस्थापनाने साखर कारखान्याच्या गळीत हंगाम चालविण्यासाठी वापरलेली साडे तीन कोटीची कर्जे सन 2007 पर्यंत बँकेत भरली गेली नाहीत. तसेच केंद्र शासनाने सन 2008 साली जाहीर केलेल्या शेतकर्यांच्या कर्जमाफी योजनेतही जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने आणि व्यवस्थापणाने शेतकर्यांची थकीत कर्जे समाविष्ट केली नाहीत. त्यामुळे सन 2007 पासून सहकार न्यायालयाच्या माध्यमातून कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील थकीत कर्जदार ऊस वाहतूक करणार्या शेतकर्यांना जप्तीच्या कारवाईच्या नोटीसा येवू लागल्या.
सन 2009 साली माजी महसुलमंत्री डॉ. शालीनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे राज्य सहकारी बँकेने कोट्यावधी रुपयांच्या थकीत कर्जापोटी जरंडेश्वर सहकारी कारखाना विक्रीला काढला. माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी ‘‘गुरु कमोडिटीज प्रा. लि.’’ या खाजगी कंपनीच्या माध्यमातून 65 कोटी 75 लाखाला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेतला. मात्र त्यामुळे सन 2003 साली शेतकर्यांच्या नावे काढलेली आणि तत्कालीन साखर कारखाना व्यवस्थापनाने वापरलेली साडे तीन कोटीची थकीत कर्जे संबंधित शेतकर्यांच्या नावे तशीच राहीली. आज साखर कारखाना अजितदादांच्या माध्यमातून जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लि. या नावाने गेली नऊ वर्षे सुरु आहे. मात्र 158 शेतकर्यांच्या नावे काढलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा कराड जनता बँकेने सहकार न्यायालयाच्या माध्यमातून सुरु केला आहे.
आज अखेर ऊस वाहतूक करणार्या शेतकर्यांनी सन 2003 साली घेतलेल्या कर्जाची थकीत रक्कम 9 कोटीच्या पुढे गेली आहे. या 158 शेतकर्यांच्या नावे बँकेने टाकलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीची कारवाई सुरु झाली आहे. जनआंदोलन करण्याचे निवेदन ही कोरेगावच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना दिले. सदाशिव पवार, दुष्यंतराजे शिंदे, युवराज कदम, विष्णू साळुंखे, सुरेश सकुंडे, विजय चव्हाण, विलासराव बर्गे, नंदकुमार बोधे, दत्तात्रय कदम, हणमंत जगताप, गोपीनाथ निकम, अनिल फाळके, दिलीप फाळके, तानाजी माने, मदन माने, सुनील वीर, अविनाश देशमुख, हणमंत खाडे, उत्तम मुळीक, जगन्नाथ सावंत सह कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यात 70 शेतकरी ऊस वाहतूकदार या बैठकीला उपस्थित होते.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |