02:46am | Jul 25, 2019 |
सातारा : लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षांनी आपली मोर्चेबांधनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आता विधानसभेच्या रिंगणात विजय मिळवण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले आहे. साताऱ्यात गुरुवारी अजित पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीमधील इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी भवन येथे घेतल्या जाणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर आणि जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. ज्या इच्छुकांनी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मुलाखती 24 जुलै रोजी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. साताऱ्यातील सदर बझार येथील राष्ट्रवादी भवनात या मुलाखती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत राष्ट्रवादी भवनात प्रथम शहर आणि त्यानंतर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. विधानसभेसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी समर्थकांसोबत येताना परिचय पत्र आणावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.
विधान परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचा झालेला पराभव, पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभव या साऱ्या घडामोडीनंतर बॅकफूटवरच्या राष्ट्रवादीने पत राखण्यासाठी आक्रमक तंत्राचा अवलंब केला आहे. स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुलाखती होणार असल्याने राष्ट्रवादीच्या तंबूत प्रचंड गर्दी राहणार आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सातारा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अद्याप फॉर्म न नेल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. गुरूवारी राष्ट्रवादी भवनात त्यांची उपस्थिती असणार की नसणार हा उत्सुकतेचा विषय आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या वाढत्या गाठीभेटी व साताऱ्यात शरद पवारांची टाळलेली भेट आणि त्यानंतर मी कुठेच जाणार नाही हे थेट वक्तव्य यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भलतेच चर्चेत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |