भुईंज : वाई वाठार रस्त्यावर शिरगाव घाटात मका वाहतूक करणार्या एका मालट्रकला आज संध्याकाळच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत लाखोची हानी झाली. तर आगीच्या ज्वाला शिरगावच्या डोंगरात पोहचल्याने अडीच ते तीन एकर गवत आणि झाडेझुडपे भस्मसात झाली आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वाई वाठार रस्त्यावर वाठार ते जोशीविहीरकडे निघालेल्या ट्रकला शिरगाव घाटात सायंकाळी 5 च्या दरम्यान अचानक आग लागल्याने मालट्रकचे केबीन जळून खाक झाले. दरम्यान आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने आगीच्या ज्वाला शेजारच्या डोंगरात पोहचल्या व काही क्षणातच डोंगर पायथ्यावरचा अडीच ते तीन एकरमधील गवत आणि झाडेझुडपे भस्मसात झाली. याची पहिली खबर भुईंज पोलीसांना मिळताच सपोनि शाम बुवा व पोलीस उपनिरीक्षक दुर्गानाथ साळी़, हवालदार धायगुडे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत अग्नीशामक दलाला पाचाहरन केले व आग आटोक्यात आणली. परंतु सदर घटना वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने घटनास्थळी वाठारचे सपोनि एम.बी.खेडकऱ पोलीस हवालदार सचिन जगताप़, इम्रान मुलाणी़, नामदेव जाधव यांनी रात्री उशीरा पंचनामा केला.
दरम्यान शिरगाव डोंगरात आगीचे व वणवा लावण्याचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून ते मानवी वस्तीत पोहचतात. यापुर्वी बिबटया़, रानगवे़, हरणे व दोन दिवसापुर्वी एक कोल्हा जोशीविहीर येथे निदर्शनास आला होता. यावर खबरदारी म्हणून वाई वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे यांनी 9561522631 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. आगीच्या घटना व प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची सांगड घालत महामार्गावर व इतर रस्त्यावर विशेषतः शिरवळ ते आनेवाडी टोलनाका या दरम्यान किसनवीर कारखान्याचा अग्नीशामक बंब व आपतकालीन यंत्रणेची दमछाक होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महामार्गावर अग्निशामक यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी असी मागणी जोर धरू लागली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |