सातारा : पोल्ट्री शेडच्या अनुदानाची फाईल वरिष्ठ अधिकार्याला सादर करण्याच्या मोबदल्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप महादेव नाझीरकर (वय 50, मूळ रा. खटके वस्ती, पो. गोकळी ता.फलटण सध्या रा.नारायण अपार्टमेंट, बारामती) याला अटक केली. तो सध्या पशुवैद्यकीय दवाखाना बरड ता.फलटण येथे कार्यरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे फलटण तालुक्यातील आहेत. तक्रारदार यांच्या आईच्या नावे 1000 मासंल कुक्कुट पक्षी पालनाची पोल्ट्री आहे. या पोल्ट्री शेडसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. शासनाची याबाबतची योजना असल्याने ते डॉ.दिलीप नाझीरकर याला भेटले. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्याने संबंधित काम करण्यासाठी व ती फाईल वरिष्ठ अधिकार्यांना पाठवण्यासाठी 2500 रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती दिल्यानंतर एसीबी विभागाने तक्रार लिहून घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर दि. 4 रोजी याबाबत पडताळणी केली असता लाचेची मागणी झाली असल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती 2 हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचेची रक्कम शुक्रवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने ट्रॅप लावला. दुपारी 2 हजार रुपये स्वीकारताच एसीबी विभागाने डॉ. दिलीप नाझीरकर याला ताब्यात घेतले. ट्रॅप झाल्याचे समोर आल्यानंतर फलटण तालुक्यात खळबळ उडाली. संशयित डॉक्टरला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबी विभागाने डॉ.नाझीरकर याला अटक केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |