12:10am | Jun 15, 2018 |
सातारा : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही तेढ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर शासन केले जाईल तसेच सर्वांनी शांततेचे ऐक्य दाखवून हा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. दरम्यान, सातार्यात लवकरच ‘स्वच्छ सुंदर फुटपाथ मिशन’ राबवले जाणार असून सातारा पालिकेने त्याला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
पोलिस करमणूक केंद्रामध्ये गुरुवारी जिल्हा शांतता कमिटीची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, शांतता कमिटीमध्ये विविध विषयांवर चर्चा होत असल्याने चांगली बाब आहे. अतिक्रमण, गणेशोत्सव अशा विविध विषयांसाठी सातारा पालिकेच्या मुख्याधिकार्यांना तत्काळ बैठक लावण्याचे आदेशच यावेळी त्यांनी दिले. तंटामुक्ती समितीबाबतही पोलिसांनी गंभीर दखल घेवून त्या कार्यान्वित कराव्यात. जिल्ह्याला शांततेची ओळख असून यामध्ये कोणी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास संशयितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाणे चांगली कामगिरी करत असून त्याआधारे सोशल मिडीयावर लक्ष ठेवले जाणार आहे.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, बैठकीमध्ये सातार्यातील अतिक्रमण, फुटपाथ याबाबत सामान्य नागरिकांची मोठी कैफियत आहे. यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी पोलिस निश्चित प्रयत्नशील राहतील. मात्र त्यासाठी पालिकेनेही सहकार्य करावे. आता पालिकेच्या निवडणूकाही नसल्याने अतिक्रमण व फुटपाथवर कारवाई करण्यास कोणाचीच अडचण राहणार नाही. सातार्यातील नगरसेवकांनीही याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन एसपी संदीप पाटील यांनी केले. दरम्यान, ग्रामीण भागात महिला सुरक्षिततेबाबत पोलिसांचे काम चांगले राहिले. शहरी भागातही ते उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही पालिकेची भूमिका मांडली.
दरम्यान, सुरुवातीला नरेंद्र पाटील, अॅड.रफिक शेख, गणेश भिसे, अंगद सावंत, वर्षाताई देशपांडे यांनी आपली भूमिक मांडली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, पोनि नारायण सारंगकर, पोनि किशोर धुमाळ, पोनि प्रदीप जाधव, नगरसेवक धंनजय जांभळे, रिध्दी पवार, प्रकाश गवळी, फिरोज पठाण, निमिष शहा तसेच नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |