सातारा : साबळेवाडी ता.सातारा येथे रविवारी सकाळी अंत्यविधीसाठी मृतदेह घेवून निघालेल्या लोकांना रस्त्यावरुन अटकाव झाल्यानंतर त्याचे गावात तीव्र पडसाद उमटले व त्यावरुन दुपारी तुफान राडा झाला. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात पोलिसांची एक स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यता आली आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, साबळेवाडी येथे रविवारी एकाचा मृत्यू झाला होता. मृतदेह अंत्यविधीसाठी घेवून संबंधित कुटुंबिय, नातेवाईक निघालेले होते. यावेळी एका शेतातून जात असताना तेथून मृतदेह घेवून जावू नये, यासाठी काहीजण समोर आले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर दुसर्या रस्त्याने मृतदेह नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यातूनच दोन गटात तुफान राडा झाला.
साबळेवाडी येथे भरदुपारी लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याने यामध्ये सुमारे चौघेजण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. गावातील तणावपूर्ण वातावरण पाहून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |