03:58pm | Nov 03, 2018 |
सातारा : सतत वादाच्या भोवर्यात सापडणारे सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा एकमुखी ठराव होऊनही अद्याप ते कार्यरत असल्याने धुमाळ मोकाट कसे? अशी चर्चा शिक्षकांमधून झडू लागली आहे. दरम्यान, पंचायत समितीमधील एका कार्यक्रमासाठी धुमाळ यांनी शिक्षकांकडून 50,000 रुपयांची बिदागी गोळा करून ते पैसे कार्यक्रमावर खर्च केले, असा आरोप शिक्षक संघटनेच्या एका नेत्याने सभापती मिलिंद कदम यांच्याशी बोलताना केला असल्याची खात्रीशीर माहिती आहे. आज शनिवारी सातारा पंचायत समितीची मासिक सभा असून या सभेत याबाबत पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
गटशिक्षणाधिकारीपदी रुजू झाल्यापासून संजय धुमाळ यांनी सातत्याने शिक्षकांना, केंद्र प्रमुखांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले. शाळांना अचानक भेटी देवून जाणीवपूर्वक त्रुट्या काढणे, केंद्र प्रमुखांना विनाकारण पंचायत समितीमध्ये बोलावून दिवसभर थांबवून घेणे, असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने शिक्षक, केंद्र प्रमुखांमध्ये असंतोष खदखदु लागला आहे. धुमाळांच्या कार्यशैलीबाबत सभापती, उपसभापती, सदस्यांमध्येही पडसाद उमटले. परिणामी महिन्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमुखाने संजय धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असा ठराव राहुल शिंदे यांनी मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. या घटनेला एक महिना उलटून गेला तरी संजय धुमाळ अद्याप कार्यरत असल्याने पंचायत समिती सदस्य व प्रशासनाने त्यांना अभय दिले की काय? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ, पटवाढ करणे, शिक्षकांशी सुसंवाद साधण्यापेक्षा मी राजपत्रित अधिकारी आहे. सीईओसुद्धा माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत, अशी मुक्ताफळे उधळण्यातच ते धन्यता मानीत असल्याने धुमाळांवर वरदहस्त कोणाचा? अशी विचारणा होवू लागली आहे. जुलै महिन्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने धुमाळ यांनी शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांची बिदागी उकळली. मात्र ती खर्च न करता स्वत:च गिळली, असा आरोप शिक्षक संघटनेच्या एका बड्या नेत्याने केला आहे. याबाबतची माहितीही त्या नेत्याने मिलिंद कदम यांना दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
सोमवारपासून कार्यवाही करणार
दीपावलीच्या शाळांना सुट्ट्या, शिक्षकांचे पगार या काही तांत्रिक कारणांनी धुमाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवले नाही, त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सध्या चौकशी सुरु आहे, त्यांच्याकडून काही चुकीचे झाले असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना पाठीशी घालणार नसल्याची प्रतिक्रिया सभापती मिलींद कदम यांनी दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |