कराड : भव्य राजदरबाराप्रमाणे शोभेल असा हॉटेल सफायरचा अलिशान शामियाना, सर्वत्र लाल गालिच्या भव्य काचेचे मोठे झुंबर, छ. शिवरायांची देखणी मूर्ती व भवानी तलवारीची (प्रतीकृती) व फुलांची आकर्षक सजावट शिंगतुतारीची ललकारी व भगवे फेटे परिधान केलेल्या मावळयांची झुंबड अशा शिवमय भगव्या वातावरणात छ. शिवरायांच्या जयघोषात ‘आर.जे.के एक्स्पोर्टस प्रा.लि’ चे उद्घाटन समारंभ शाही दिमाखदार पद्धतीने ‘शिवजयंतीदिनी’ ‘हॉटेल सफायरमधे’ संपन्न झाला.
यावेळी आर.जे.के. एक्स्पोर्टच्या प्रमाणपत्र फाईलचे अनावरण दिलीपभाऊ चव्हाण, संचालक राहुलकुमार खडके, डॉ.सौ. सुनंदा पवार, बाबूराव पवार, पत्रकार सतिश मोरे, पत्रकार प्रमोद सुकरे, प्रा.श्रीकांत नाईक (शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर), संदीप सूर्यवंशी (शिवराज शिपिंग, मुबंई), विठ्ठल खडके, सौ.इंदू खडके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच आर.जे.के एक्स्पोर्ट प्रा.लि.च्या प्रमाणपत्राचेही अनावरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व भवानी तलवारीचे (प्रतीकृती) पूजन मान्यवरांच्या हस्ते करून ध्येयमंत्र म्हणण्यात आला तसेच जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राहुलकुमार खडके यांच्या कन्या कु. सुप्रजा व कु. शिवांजली यांनी केलेल्या भवानी आवाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खडके घराण्याचे कुलदैवत जोतिबा येथून खास आशिर्वाद म्हणून उपस्थित राहिलेले उदय जुगर यांच्याकडून मानाचे श्रीफळ, शाल व कुलदैवत मूर्तीचा स्विकार ‘राहुलकुमार खडके’ यांनी केला. श्री बालाजी अपंग पुर्नवसन व शिक्षण प्रसारक मंडळ, इस्लामपूर यांना शैक्षणिक मदतीचा धनादेश संचालक लक्ष्मण माने यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिलेदार भगव्याचा’ या पुरस्काराचे वितरण सत्कारमूर्ती जयसिंग दादू क्षीरसागर (कराड) व नितीन बबन शेलार (मनिकर्णिका, फाईट मास्टर) यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविक करताना राहुलकुमार खडके म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील कलिंगड, टरबूज, स्टॉबेरी, पपई, द्राक्षे या फळांना पॅसेंजर कु्रझवर सॅलेडसाठी प्रचंड मागणी आहे. त्यामुळे उत्कृष्ट व दर्जेदार फळे परदेशी एक्स्पोर्ट करून परदेशात हक्काची बाजारपेठ व योग्य दर शेतकर्यांना मिळावा हे आपले उद्दिष्टय आहे.
अध्यक्ष दिलीपभाऊ चव्हाण म्हणाले, मराठी माणसांकडे गुणवत्ता आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, व्यावसायिक दृष्टीकोन, व बिझनेस प्रेझेंटेशन खूप महत्वाचे आहे असे असेल तरच व्यवसायात यश नक्की मिळेल.
डॉ.सुंनदा पवार म्हणाल्या, आर्थिक पाठबळाचे कारण सांगून मराठी उद्योजक धाडस करीत नाहीत. सुयोग्य दृष्टीकोन व आत्मविश्वासाच्या बळावर यश खेचून आणता येते. यावेळी प्रा.प्रमोद सुकरे, सतिश मोरे, बाबूराव पवार, प्रा.श्रीकांत नाईक, संदिप सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले व सौ. स्वाती पिसाळ यांनी आभार मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |