कराड : शहराच्या विकासाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देताना समाजसेवेचा वसा अखंडपणे जोपासू, असे प्रतिपादन कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केले.
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित राजेद्रसिंह यादव मित्र परिवार यांनी भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला सुमारे तीन हजार युवक, युवतींनी उपस्थिती लावली होती.
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, डॉ. चंदुगडे, गौतम करपे, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, किरण पाटील, राजेंद्र कांबळे, विजयसिंह यादव, जयवंत गुजर, विजय भोसले तसेच नगरसेविका सौ. आशा मुळे, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, स्मिता हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, प्रत्येकाने आयुष्यात यश मिळविण्यासाठी सातत्य जोपासण्याची गरज आहे. तरुण वर्गाला योग्य दिशेने पुढे नेले पाहिजे. मेळाव्यात सुमारे 1400 उमेदवारांना तात्काळ रोजगार उपलब्ध होणार आहे. गोरगरीब, गरजू व कष्टकरी समाजातील मुला, मुलींना प्रगतीची दारे खुली होणार आहेत, असेही राजेंद्रसिंह यादव म्हणाले.
उत्तमराव दिघे, म्हणाले, प्रायव्हेट कंपनीत काम करणे म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा कमी नाही. रोजगार मेळाव्यातून युवकांना नोकरीची संधी मिळत आहे.
यशवंत डांगे म्हणाले, राजेंद्रसिंह यादव राबवीत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून आपण उपस्थित युवा वर्गाने याचा लाभ घेऊन आपली आयुष्याची वाटचाल यशस्वी करावी. अमरदीप वाकडे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले.
रोजगार मेळाव्यात सुमारे 37 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात महिंद्रा, व्हील्स इंडिया, सुप्रिम हिंदुस्थान आदी नामांकीत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. बांधकाम, इलेक्ट्रीकल, बँकिंग अशा क्षेत्राशी निगडित असणार्या कंपन्यांचा सहभाग होता. प्रस्ताविक सचिन पाटील यांनी केले. आभार संदीप मुंढेकर यांनी मानले. रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी ओंकार मुळे, शहनवाज मोमीन, बापू देसाई, सुधीर एकांडे यांनी परिश्रम घेतले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |