11:30pm | Jun 28, 2019 |
सातारा : सातारा शहरात एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिका कारवाईचा हातोडा उगारणार आहे. ही मोहीम तगड्या पोलीस बंदोबस्तात मंगळवार पासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.
राजवाडा, पाचशे एक पाटी, सातारा मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे रडारवर ठेवण्यात आली आहेत. सातारा शहराचे राजपथ, कर्मवीर पथ व राधिका रोडवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. पालिकेतल्या लाल फितीचा कारभार व धनदांडग्यांची दंडेलशाही यामुळे साताऱ्यात अतिक्रमणे गाजर गवतासारखी फोफावली. गोडोली, शासकीय विश्रामगृह मार्ग, सदर बझार कँप, पोवई नाका मंडई परिसर येथे सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून सुद्धा अतिक्रमणे तात्पुरती निघायची आणि मोहीम पुढे सरकली की पुन्हा पथारी मांडली जायची. मंगळवार तळे रस्ता अशा अतिक्रमणांचे उत्तम उदाहरणं आहे. मात्र ग्रेड सेपरेटरचे काम सत्तर टक्के उरकल्याने लगतच्या सर्विस रोडने वाहतुकीचा ताणं कमी केला जात आहे. पोलीस प्रशासनाच्या बैठकीत एकेरी वाहतुकीचे संकेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. त्यानुसार शाहू चौक ते मोती चौक व मोती चौक ते पोवई नाका येथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती कॉर्नर, एस टी स्टॅन्ड परिसर, पाचशे एक पाटी, खुटाळे बोळ, राजवाडा परिसर येथे अतिक्रमणे असून त्यांना कारवाईच्या रडारवर घेण्याचा निर्णय झाला आहे. सातारा पालिकेची अतिक्रमणं मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असून या मोहिमेची सुरवात मंगळवार पासून सुरू करण्याचे संकेत मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी दिले आहेत.
रविवार पेठेवरही लक्ष द्या !
साताऱ्यात अतिक्रमणांची बजबजपुरी माजली आहे. रविवार पेठेत एका टग्याने टिळक मेमोरिअल चर्चपुढे टपऱ्यांची रांग लावली आहे. परत पालिकेच्या यंत्रणेला दमात घ्यायला तो मागे पुढे बघत नाही. जो रिक्षा तळ खाजगी प्रायोजकाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला त्या रिक्षा तळाच्या प्रवेशद्वारावरच बंद टपऱ्यांची रांग आहे. या अतिक्रमणांची संवेदनशीलता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी दिली. अतिक्रमण मोहिम कोणत्या राजकीय दबावात न येता खंबीरपणे राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |