गांधीनगर : गुजरातमधील गीर जंगलात गेल्या काही दिवसात 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 6 नर सिंह, 3 मादी सिंह आणि 2 नर बछड्यांचा समावेश आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गीर अभयारण्याच्या पूर्व भागात 11 सिंहांचे मृतदेह आढळले.
या सर्व सिंहांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. मात्र यातील 4 सिंहांचा मृत्यू हा फुफ्फूस आणि यकृत संसर्गामुळे झाल्यानं वनाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे मृत्यू झालेल्या सर्वच सिंहाचे शवविच्छेदन करुन अंतिम अहवाल आल्यानंतर सिंहांच्या मृत्यूचं कारण समजेल.
गुजरातमधील गीरचं जंगल हे एकमेव असं जंगल आहे जिथं आशिया खंडातून लुप्त होणाऱ्या सिंहांच्या प्रजातींचं संवर्धन केलं जातं.
सर्वात आधी बुधवारी एका सिंहाचा मृतदेह आढळला होता. मग त्याच दिवशी आणखी तीन सिंह मृतावस्थेत आढळले. त्यानंतर काही दिवसात एक-एक करत सात सिंहांचे शव मिळाले. वनअधिकाऱ्यांनी मृत सिंहांच्या व्हिसेराचे नमुने घेतले आहेत. ते नमुने जुनागढच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सिंहांच्या मृत्यूचं कारण समोर येईल.
दरम्यान, 8 सिंहांचा मृत्यू हा परस्परांवरील हल्ल्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर 3 सिंहांच्या मृत्यूचं कारण गुलदस्त्यात आहे. एकदंरीत सर्वच सिंहांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच येईल.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |