03:48pm | Apr 03, 2020 |
सातारा : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. गरीब लोकांना रेशनिग वाटप करण्यासाठी सरकारचा पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. पण सातारा शहरानजिक प्रतापसिंह नगरातील रास्त शिधा वाटप केंद्र क्रमांक ३९ मध्येच गरिबांच्या रेशनिगवर काटामारी होत असल्याची बाब जागरूक ग्राहक वर्गाने उघडकीस आणली आहे.
याबाबत खास महितीगारांनी सांगितले की, सातारा शहरनजिक सुमारे दिड हजार लोकसंख्येची प्रतापसिंह नगर वस्ती आहे. या ठिकाणी कष्टकरी, मजूर, भाजी -फळे विक्रते, रिक्षा, टेम्पो चालक, कचरा -भंगार वेचक तसेच काही प्रमाणात नोकरदार, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कुटुंबासह राहतात. त्यांना रास्त भावात शिधा उपलब्ध करण्यासाठी वीस ते बावीस वर्षांपासून या नगरातच सरकारमान्य शिधा वाटप दुकान आहे. कोरोनामुळे येथील लोकांनी घरातच थांबणे पसंद केले आहे. त्यातील शिधा वाटप कार्डधारकांना रास्त भावात गहू, तांदूळ, साखर व काही डाळी वाटप होत आहेत. काहींना एका किलो धान्याच्या मागे शँभर ग्राम धान्य कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नगरात कुजबुज सुरू झाली. काहींनी जाब विचारण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. पाचपेक्षा जास्त गरीब लोक जमा होऊ लागले. कायदा व सुव्यवस्था कशी राखावी? हा स्थानिकांच्या मनात आला. त्यांनी ही बाब सरपंच व शिधा वाटप समितीचे विजय शिंदे, ग्रामविकास अधिकारी डी डी माने, माजी सरपंच सिताबाई गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते किरण ओव्हाळ, बाबा ओव्हाळ यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी वजन काट्याची त्रुटी दूर करून योग्य मापात गरिबांना शिधा देण्याची सूचना केली. तत्पूर्वी अनेकजण कमी वजनाचा शिधा घेऊन निघून गेले होते. त्यांनीही तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |