02:30am | Aug 12, 2018 |
दहिवडी : मार्डी ता. माण येथे शुक्रवारी (दि. 10) लाचलुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दहिवडीचे पोलीस उपनिरीक्षक दबडे यांच्यावर कारवाई केली. मात्र याप्रकरणात लाचेची मागणी करण्यामध्ये सहाय्यक निरीक्षक प्रविण पाटील यांचाही सहभाग असून त्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लाचलुचपत प्रकरणातील तक्रारदाराने पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मार्डी येथील एका हॉटेल व परमीट रुमच्या शेजारी दहिवडी पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता छापा टाकला. या छापा कारवाईत काहीही कारण नसताना हॉटेल व परमीट रुम चालकाला गोवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधीतावर दबाव टाकून लायसन्स रद्द करण्याचा रिपोर्ट जिल्हाधिकार्यांना पाठवतो, अशी धमकी देण्यात आली. तसेच रिपोर्ट न पाठविण्यासाठी दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. परमीट रुम चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. त्यानंतर लाचलुचतपच्या अधिकार्यांनी सापळा रचून उपनिरीक्षक दबडे यांच्यावर कारवाई केली. मात्र याप्रकरणात उपनिरीक्षक दबडे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक प्रविण पाटील यांचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारदाराने निवेदनात केला आहे. याबाबतची खात्री करण्यासाठी 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंतचे दहिवडी पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेज आणि लाच लुचपत विभागाकडे असणारे रेकॉर्डींग तपासण्यात यावे. व्हाईस रेकॉर्डींगमध्ये सहाय्यक निरीक्षक प्रविण पाटील याचा सहभाग असल्याचे उपनिरीक्षक दबडे याच्या बोलण्यावरून दिसून येते, असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |