कराड : माळवाडी ता. कराड गावच्या हद्दीत खालतीकडचे शेत नावचे शिवारातील धोंडीराम शंकर जगताप माळवाडी यांचे यादववाडी गावचे हद्दीतील उसाचे शेताचे बांधावर जनावरांकरिता वैरण काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी हजारमाची येथील पती-पत्नीला अवघ्या 12 तासात जेरबंद करून खुनाच्या घटनेचा छडा लावला.
सुमन शंकर शेलार रा. माळवाडी, ता. कराड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर काशिनाथ गोरख काळे (वय 29) अनिता काशिनाथ काळे (वय 26, रा. ओगलेवाडी हजारमाची ता. कराड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माळवाडी ता. कराड येथील सौ. सुमन शेलार या यादववाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतामध्ये जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन त्यांना दगडाने मारून गंभीर जखमी करून खून करण्यात आला होता. तसेच प्रेत यादववाडी व माळवाडी गावांमधून वाहणार्या ओढ्यातील करंजाच्या झाडास पाण्यात सुटलेल्या मुळ्यांना सुरुंगाची तार व तिच्या अंगावरील साडीने प्रेत ओळखून येऊ नये म्हणून पाण्यात पालथ्या स्थितीत खोलगट भागात लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न करताना त्यांनी विरोध केल्याने आरोपींनी मयतास दगडाने दोन्ही कानावर, कपाळावर, डोक्यात व दोन्ही हातावर दगडाने मारून तिचा निर्घुण खून करून प्रेत 200 मीटर वर नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक सातारा तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांची टीम तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा, गुन्हे अन्वेषण टीम कराड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास एका गोपनीय खबर्यामार्फत सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी करवडी ता. कराड येथे मोकाट फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे व उंब्रज पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी तातडीने करवडी येथे पोहोचून मोठ्या धाडसाने व शिताफीने संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्हा बायकोच्या मदतीने केले असल्याची कबुली दिली. याबाबतची फिर्याद नानासो विष्णू शेलार (रा. माळवाडी) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |