01:47pm | Mar 27, 2024 |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस राहिले आहेत. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय पक्ष, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराचा सक्रीय होऊन प्रचार आणि प्रचार करताना दिसत आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीने देशभरातील पाच शहरांमध्ये छापेमारी केली असून, यातून २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एके ठिकाणी केलेल्या छापेमारीत चक्क वॉशिंग मशीनमध्ये नोटांची बंडले लपवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे धाडी टाकल्या आहेत. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या टाकलेल्या धाडीत २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच काही कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच यासंबंधित ४७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी पाठवले
कंपनीचे संचालक आणि पार्टनर संदीप गर्ग, विनोद केडिया यांच्याशी संबंधित काही ठिकाणीही धाड टाकण्यात आली. यामध्ये लक्ष्मीटन मेरिटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लि., स्टवार्ट अलॉयज इंडिया प्रा. लि., भाग्यनगर लि., विनायक स्टील्स लि., वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आदींचा समावेश आहे. या ठिकाणांवर छापेमारी केव्हा करण्यात आली याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. सिंगापूरच्या गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक आणि हॉरिझॉन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपन्यांच्या मदतीने तसेच FEMA कायद्याचे उल्लंघन करून भारताबाहेर परकीय चलन पाठवण्यात या कंपन्या सामील आहेत. तसेच या कंपन्याचे व्यवस्थापन अँथनी डी सिल्वा यांच्या वतीने केले जाते. शेल कंपन्यांच्या मदतीने सिंगापूर येथील कंपन्यांना १८०० कोटी रुपये पाठवण्यात आले, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, सिंगापूर येथील कंपनीला पैसे पाठवण्यासाठी मेसर्स नेहा मेटल्स, मेसर्स अमित स्टील ट्रेडर्स, मेसर्स ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, मेसर्स एचएमएस मेटल्स आदी बनावट कंपन्यांच्या मदतीने बनावट व्यवहार दाखविण्यात आले.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |