पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ पेक्षा अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या घरबसल्या मतदान करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्यांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी त्यांनी ‘१२ ड’ हा अर्ज भरून दिल्यास जिल्हा निवडणूक यंत्रणा संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी पोहोचले असून त्यांना मतदानाच्या पर्यायाबाबत विचारणा करण्यात आली आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सध्या पुण्यात राहत असून त्यांचे वय नव्वदीच्या घरात आहे. या संदर्भात यांच्या कार्यालयाकडूनही जिल्हा निवडणूक शाखेकडे घरबसल्या मतदानाची सवलत मिळावी, याबाबतचा १२ ड अर्ज केला होता. जिल्हा निवडणूक शाखेने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाटील यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील गेल्या एक महिन्यापासून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी या पर्यायाचा लाभ घेतला आहे. प्रतिभाताई पाटील या २००७ ते २०१२ दरम्यान देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्यरत होत्या.
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |

उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |