अकोला : श्रीनिवास पवार हे आजपर्यंत कुठेही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी माझं कुटुंब माझ्यासोबत नसेल. पण बारामतीची जनता हेच माझे कुटुंब आहे असं म्हटलं होतं. ते वास्तव आहे. श्रीनिवास पवार काटेवाडीत जे काही बोलले, घरातीलच माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची ही जुनीच पद्धत आहे. सख्खा भाऊ विरोधात उभा केला तर आपण निवडणूक जिंकू शकतो असं वरिष्ठांना वाटत असेल तर हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा आहे. तो कधीही फुटू शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत. त्यांना डाव कपट जमत नाही. त्यांना घेरणे सोप्पे असेल असं वाटत असेल पण हा अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडून रणांगण मारेल. स्वत:च्या सख्ख्या भावाला उभं करण्याचा हा कुटील डाव आहे. जाणीवपूर्वक बारामतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्यात येते. पण बारामतीकर खूप जागरुक आहेत. अजितदादांच्या मार्गदर्शनात सुनेत्रा पवार लाखोंच्या मताधिक्यांनी जिंकतील असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत श्रीनिवास पवार इतके दिवस का बोलले नाहीत, भावनिक विषय काढून जाणीवपूर्वक द्विधा मनस्थिती बारामतीकरांवर करू नका. भावनिक वातावरण तुम्ही निर्माण करतायेत. २०१४ ला न मागता भाजपाला तुम्ही पाठिंबा दिला, २०१९ ला भाजपासोबत बोलणी तुम्ही करायची आणि आता जर कुणी भूमिका घेतली असेल तर आरोपीच्या पिंजऱ्यात अजितदादांना का उभे करायचे? अजित पवारांसोबत आम्ही वैचारिक सोबत आहोत. तुम्ही इतक्या प्रतिष्ठेची ही निवडणूक करणार असाल तर रात्रीचा दिवस करून आम्ही सुनेत्रा पवारांना या जागेवर विजयी करून दाखवू असंही मिटकरींनी बजावलं आहे.
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |

सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |