सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात महायुतीमध्ये भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झाला आहे. पुढील २-३ दिवसात माढ्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते-पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणे पसंत केले. अद्याप मोहिते पाटील घराण्यानं त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर 'लावा ताकद.. आता माढा लोकसभा आपलीच' अशी मोहीम सुरू केली आहे. माढा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत होती. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील यांनी विरोध केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यातील वाद मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर दोघांमधील वाद शमतील असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटले होते. खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
माढ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. माढा मतदारसंघातील एक नाराज नेता गुरुवारी शरद पवार यांची भेट घेणार होता. पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील नीलेश लंके यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमामुळे या नेत्याची पवारांसोबत भेट झाली नाही. मात्र ही भेट शुक्रवारी म्हणजे आज होऊ शकते, असेही या सूत्रांनी सांगितले.
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |