नवी दिल्ली : मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिलं होतं. ECI च्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्याकांत आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह घेण्याचा पर्याय सुचवला आहे.
कोर्टात सुनावणीवेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी छगन भुजबळांच्या विधानाचा दाखला दिला. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्हाचा फोटो वापरावा हे विधान सिंघवींनी वाचून दाखवले. त्यावर तुम्ही शरद पवारांचे फोटो का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल तर तुमचे फोटो वापरा असं कोर्टाने विचारणा केली. त्यावर अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी आम्ही फोटो वापरत नाही आणि काही उत्साही कार्यकर्त्यांनी ते केले असावे. कार्यकर्त्यांद्वारे सोशल मीडियावरील पोस्टवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही असं उत्तर दिले. तेव्हा कोर्टाने पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लावणे आवश्यक असते असं सांगितले.
सिंघवी यांनी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हावर आक्षेप घेतला आणि पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह द्यायला हवे होते परंतु आम्हाला नवीन चिन्ह दिले असं त्यांनी कोर्टाला सांगितले. अजित पवार गटाने घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरावे. घड्याळ चिन्ह आणि शरद पवार अशी ओळख अतूटपणे जोडलेली आहे असं सिंघवींना कोर्टात युक्तिवाद केला. सिंघवी यांच्या युक्तिवादानंतर खंडपीठानेही याची दखल घेत अजित पवार गटाला वेगळे चिन्ह वापरण्याची सूचना केली.
कोर्टाने म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने उद्या समजा कोर्टाने हा आदेश स्थगित केला आणि निवडणूक मध्यावर असतील तर काय होईल असा सवाल न्या. कांत यांनी विचारला. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सूचना करतो, तुम्ही घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घ्या जेणेकरून शांततेने आणि तणावाशिवाय पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या चिन्हासोबत निवडणूकही लढवू शकता. आम्ही फक्त तुम्हाला हा पर्याय सूचवत आहोत. तुम्हाला तुमच्या आवडीचे चिन्ह घ्या, असं काही करता येतंय असा आम्ही पर्याय सूचवतो असं न्यायधीशांनी म्हटलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या पर्यायावर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणे गरजेचे आहे.
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |