04:55pm | Mar 28, 2024 |
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपाचे ५ उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. या उमेदवारांविरोधात कुणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अरुणाचल प्रदेशात येत्या १९ एप्रिलला विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी भाजपासाठी ही आनंदाची बातमी आली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजपाचे इतरही उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातून बिनविरोध जिंकणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील पापुम पारेसह अनेक जागांवर विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे ५ जागांवर सत्ताधारी भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
सगालीहून एर रातू तेची बिनविरोध विजयी होत एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. त्याशिवाय निचले सुबनगिरी जिल्ह्यातील जीरोहून एर हेज अप्पा यांनाही कुणी विरोध केला नाही. ज्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. तालीहून जिक्के ताको, तलिहाहून न्यातो डुकोम, सगाली रातू तेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुच्चू मीठी बिनविरोध आले आहेत. विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या ५ जागांवर भाजपा व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने किंवा अपक्षाने अर्ज दाखल केला नाही.
अरुणाचल प्रदेशात सध्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होत आहेत. त्यात ६० सदस्यीय विधानसभा आणि २ लोकसभा जागेवर १९ एप्रिलला मतदान होत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरुणाचल प्रदेशातील २ जागांवर १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूक प्रक्रियेत २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. अर्जाची पडताळणी गुरुवारी आणि ३० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. विधानसभेची मतमोजणी २ जून तर लोकसभा जागांची मतमोजणी ४ जूनला होणार आहे.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |