12:33pm | Mar 25, 2024 |
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटावाटप आणि उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीने काही जागांवर उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र, विजय शिवतारे यांच्यासह अन्य नेत्यांच्या काही भूमिकांमुळे महायुतीत काहीसा तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्याचे समजते.
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्याचे सांगितले जात आहे.
अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये
अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा आणि महायुतीसाठी कामे करा. महायुतीचे उमेदवार विजयी होतील, एवढेच बघा. बाकी सगळे बाजूला ठेवा. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये. मिशन ४५ प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी, बारामती लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. तसेच नगर दक्षिणमधील वाद मिटवण्यासाठी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं सुरू होती, असे सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, विजय शिवतारे हे बारामीत लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट करत, १२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिल्याचे समजते.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |