पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ साली घेण्यात येणार्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. एमपीएससीने प्रसिध्द केल्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारीला आणि मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै तर, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च रोजी होणार आहे.
एमपीएससीद्वारे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. एमपीएससीकडून गेल्या दोन वर्षांपासून साधारण २१ नोव्हेंबरच्या आसपास परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार गुरुवारी आयोगाने २०१९ मध्ये होणार्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च रोजी होणार असून पेपर क्रमांक एक हा २८ जुलै तर, पेपर क्रमांक दोन उपनिरीक्षक ४ ऑगस्टला, पेपर क्रमांक दोन कर निरीक्षक ११ ऑगस्टला आणि पेपर क्रमांक दोन सहायक कक्ष अधिकारी २५ ऑगस्टला होणार आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका होऊ घातल्याने एमपीएससीद्वारे वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकामुळे परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता येणार आहे, अशी माहिती एमपीएससीचे उपसचिव सुनिल अवताडे यांनी दिली.
दरम्यान, आयोगाद्वारे परीक्षेतून भरण्यात येणारी पदसंख्येबाबतचा तपशील आणि इतर माहिती वेबसाइट व प्रसारमाध्यमांतून जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससी प्रशासनाने सांगितले आहे.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक -
१. राज्यसेवा पूर्व परीक्षा - १७ फेब्रुवारी २०१९
२. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २४ मार्च २०१९
३. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - १९ जानेवारी २०१९
४. पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा - ३१ मार्च २०१९
५. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा - ७ एप्रिल २०१९
६. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा - २४ एप्रिल २०१९
७. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा - १९ मे २०१९
८. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा - २६ एप्रिल २०१९
९. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - १६ जून २०१९
१०. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २३ जून २०१९
११. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - १ डिसेंबर २०१९
१२. राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - ८ डिसेंबर २०१९
१३. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - १५ डिसेंबर २०१९
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |