08:50pm | Apr 10, 2021 |
सातारा : मागील वर्षीच्या कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग धंद्यांना उतरती कळा लागली. कोणाला व्यवसाय बंद करावा लागला तर कोणाला व्यवसाय बदलावा लागला अश्यातच चित्रपटसृष्टीलाही खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आणि अजूनही करावे लागत आहे. चित्रीकरण बंद झाल्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेकांचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग बंद झाला. अशातच काहींनी आर्थिक तडजोडीसाठी मिळेल ते काम केले. काहींनी भाजीपाला विकला काहींनी चित्रपटसृष्टी पासून लांब जाण्याचा मार्ग स्वीकारला तर काहींनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि काहींना कोरोनाने संपवले. चित्रपटक्षेत्रातील अनेक संघटना यांच्या मदतीला आल्या काहींनी अन्नधान्य वाटून मदत केली तर काहींनी आर्थिक मदतही केली यातीलच एक संघटना आहे 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'. यापूर्वी या संघटनेने अनेक चित्रपट कलाकार व चित्रपट कामगारांसाठी मदत केली आहे. वेळोवेळी चित्रपट कलाकार व कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा कारणावरून ही असोसिएशन नेहमी चर्चेत असते.
यावेळी 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'ने कोरोना काळातील झालेली आर्थिक व स्वाथ्य स्थिती लक्षात घेऊन चित्रपट कलाकार व चित्रपट कामगारांसाठी नवीन सभासद नोंदणीवर 10 लाखांचे अपघाती विमा व 1 लाखांचा कोरोना विमा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सभासद नोंदणी करताना सभासद अपघाती किंवा कोरोना विमा या दोन्हीपैकी एक विमा घेऊ शकतो.
सभासद नोंदणीवर मोफत विमा नोंदणी 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत असल्याने जास्तीत जास्त चित्रपट कलाकार व चित्रपट कामगारांनी नोंदणी करून घ्यावी, असे अवाहन 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमन खान यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |