सातारा : शनिवार आणि रविवार या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील कास पठार व परिसराला रविवारी ४ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे कास रस्त्यासह पठारावर सर्वत्र नागरिकांची गर्दी दिसून आली.
ऑनलाईनचा कोटा पूर्ण झाल्यानंतरही दिवसभर पर्यटकांची आवक जास्त असल्याने पठार फुलून गेले. पर्यटकांमुळे वाहनांची गर्दी जास्त झाल्याने यवतेश्वर घाटात काही किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे पोलिसांना कंबर कसून कसरत करावी लागली.
गत महिन्यात कास पठारावर काही प्रमाणात फुले तयार झाल्यानंतर दि. २५ ऑगस्ट रोजी हंगाम सुरू झाला होता. त्यानंतर १ सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करून पर्यटकांना प्रवेश देण्यात सुरू करण्यात आले. कास पठारावर २०० हून अधिक दुर्मिळ फुले येतात. यंदाच्या हंगामात सुरूवातील फुलांची संख्या कमी राहिली. त्यानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्यानंतर हंगाम बहरू लागला आहे. सध्या कास पठार बहरले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पठारावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कास रस्ता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काससह ठोसेघर, सज्जनगड, बामणोली, उरमोडी, कण्हेर धरण या भागात पर्यटक जात असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे.
सलग सुट्ट्यांचा योग साधून रविवारी मोठया प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली. दिवसभर पर्यटकांची ये-जा सुरू असल्याने सायंकाळी यवतेश्वर घाट, बोगदा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे काहीसा परीणाम सातार्यातील अंतर्गत रस्त्यावर दिसून येत होता. वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |