वाई : शेतातील चाळीत विक्रीसाठी ठेवलेल्या तब्बल वीस क्विंटल कांदा चोरट्यानी लंपास केल्याची घटना पळशी (ता. खंडाळा) येथील दहाबिगा शिवारात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बाजारात कांद्याचे दरात चढ उतार होत असल्याने व निश्चित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतातच चाळी करून कांदा साठवून ठेवत आहेत.दररोज शेतात काम असल्याने शेतीतील शेतघरात निवड करून विठ्ठल किसन भरगुडे (वडगाव रोड पळशी,ता खंडाळा) येथील शेतातील चाळीमध्ये सुमारे पंचवीस क्विंटल कांदा त्यांनी ठेवला होता.तो कांदा ते येत्या काळात विकणार होते.रात्री बारा ते पहाटे सहाच्या दरम्यान चोरट्यानी तो कांदा लंपास केला.ही बाब सकाळी समोर आल्यावर भरगुडे यांनी पोलिसात धाव घेतली..या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदा भाव वाढत असल्याने आता चोरट्यानी आपला मोर्चा कांदा चाळीकडे वळविला आहे. शेतातील चाळीत ठेवलेल्या चक्क वीस क्विंटल कांदा चोरट्यानी लंपास केला आहे. कांदा चोरीला गेल्याने परिसरातील शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली. आता सध्या बाजारात भाजीपाल्याला व कांदा बटाटा पिकाला भाव असल्याने शेतमालाच्या चोऱ्या वाढल्या आहेत. अगोदर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना आता शेतमालाच्या चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाडुरंग हजारे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |