08:45pm | Jul 29, 2022 |
वाई : वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.
प्रतीक लक्ष्मण भोसले (वय 19, रा. शिरगाव, ता. वाई) व हेमंत किशोर कदम (वय 19, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव ) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर शहरातून 5 हिरो हॉन्डा स्प्लेंडर व 1 बलेट अशा 6 दुचाकी चोरीस गेल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वाई पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा ही अनेक दिवसापासून तपास करीत होती. तपासा दरम्यान बाळासाहेब भरणे यांना गुरुवारी (दि. 28) खबर्याकडून माहिती मिळाली की, दोन मुले काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या मोपेड गाडीवरून संशयीतरित्या वाई शहरात फिरत आहेत. मोटार सायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेवून भरणे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचार्यांना या संशयीतांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे शोध घेत असताना एका पाठीमोगील बाजूस नंबरप्लेट नसलेल्या मोपेड गाडीवरून दोन्ही संशयीत सिध्दनाथवाडी, वाई येथे फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत महाबळेश्वर येथून 1 बुलेट व 1 हिरो हॉन्डा स्प्लेन्डर मोटार सायकल तसेच वाई शहरातून 4 हिरो हॉन्डा स्प्लैन्डर मोटार सायकल अशा सुमारे 3 लाख रुपये किंमतीच्या 6 मोटार सायकल चोरलेल्या असल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या दुचाकींपैकी काही दुचाक्या या आई, आज्जी अजारी असल्याने पैशाची गरज आहे, असे कारण सांगून विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित सर्व दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक उमेश गहीण, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रयण राठोड, हेमंत शिंदे, अक्षय नेवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |