09:03pm | May 17, 2020 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भिवडीसह इतर काही गावांमध्ये सरकारमान्य शिधा वाटप दुकानदार गफला करीत असल्याचे सिध्द झाले आहे. तसे तक्रारदार यांना लेखी कळवून सुध्दा दोषी दुकानदारवर कारवाई करण्यास नकारघंटा दिल्याने भाजप युवा नेते रमेश अनिल उबाळे यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आहे. सोमवार दि १८ मे रोजी कोरेगाव तहसिल कार्यालय समोर एकटाच उपोषणाला बसणार असून पक्ष अथवा इतरांनी आंदोलनात सहभागी न होता शारीरिक अंतर राखून पाठिंबा दयावा असे सूचित केले आहे.
कोरेगाव तालुक्यातील काही सरकारमान्य शिधा वाटप दुकानातून शिधा योग्य रित्या मिळत नाही. अधिकृत नोंदणी होत नाही. काळ्या बाजाराने धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी दिले जाते तसेच इतर तक्रारी आल्या होत्या. त्याची स्थानिक पातळीवर चौकशी झाली. त्यात तक्रारी नुसार काही त्रुटी आढळून कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व लॉकडाऊनचे नियम पाळून सोमवार दि.१८ रोजी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाण्यात दिली आहे.
भिवडी येथील शिधा वाटप दुकानाबाबत तक्रार केल्यानंतर आपण सदर माहिती कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांनी तलाठी व मंडलाधिकाऱ्याद्वारे सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सबंधीत दुकानदार दोषी असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत तहसीलदारांनी तक्रारदार भाजप युवा नेते रमेश उबाळे यांना तसे लेखी पत्र पाठवून सरकारी सोईस्करपणे साचेबंद मुद्दे मांडले. त्यामध्ये सरकारमान्य शिधा वाटप बाबत दुकानदारावर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना असल्याचे पत्रात नमूद केले आहे.तसेच हे प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविले. परंतु, एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी भिवडीच्या दुकानदारावर कारवाई होऊ शकली नाही.
भिवडी प्रमाणे कोरेगाव तालुक्यातील आसरे व इतर गावांमध्ये काळ्या बाजाराने सरकारमान्य शिधा विकण्यात येत आहे. गरीब कुटूंबियांना स्वस्त दराने धान्य मिळत नाही याबाबत अनेक गावाच्या तक्रारी आल्या आहेत. कारवाई होत नसल्याने कोरेगाव तालुक्यातील अन्याय अत्याचार मिटविण्यासाठी सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची? यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित आदेश काढावेत अशी ही मागणी केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून सामान्य जनतेला वेळकाढूपणाचा त्रास सहन करावा लागणार नाही.
सध्या कोरोनामुळे सातारा जिल्हा लॉकडाऊन आहे. शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून एकटेच उपोषणाला बसणार असून भारतीय जनता पक्षाच्या अथवा इतर कोणत्याही कार्यकर्त्यांने उपोषणामध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन रमेश उबाळे यांनी केले आहे.या उपोषणाकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे. सत्तेत सहभागी असलेल्या आमदारांचे समर्थक कार्यकर्त्यांवर उपोषण करण्याची वेळ आल्याने कोरेगाव मतदारसंघात तो एक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. याच मुद्यावरून भाजप निष्ठावंत कार्यकर्ते सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय विरोधकांना अडचणीत आणू शकतात असे मानण्यात येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |