11:31pm | May 21, 2020 |
सातारा : कराडपाठोपाठ आज साताऱ्याला कोरोनामुक्तीची लॉटरी लागली. सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे ८ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले. रूग्णालयाने त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छांचा 'पुष्पगुच्छ' देऊन रुग्णालयातून बिदा केले. कोरोनाबाधितांच्या संख्येने दुसरे शतक गाठले असले तरी जिल्ह्यातील कोरोनामुक्तांनी शतक साजरे केल्याने लोकांचे मनोधैर्य चांगले राहिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज कोरोनाचे आणखी २० रूग्ण निष्पन्न झाले.
काल रात्री उशीरा कोरोनाचे १५ रूग्ण निष्पन्न झाल्यामुळे जिल्हावासीयांना हादरा बसला. या १५ सह आज संध्यकाळ पर्यंत २० रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०१ पर्यंत जावून पोहोचली. त्यानंतर आज सकाळी ४ तर संध्याकाळी आणखी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रात्री अशीरा येऊन धडकल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २०१ वर गेला आहे. आजच्या चार कोरोना बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, म्हावशी येथील ४५ वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील कलेढोण येथील एक ४५ वर्षीय पुरुष तसेच कराड तालुक्यातील उंब्रज येथील ४० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. हे रूग्ण कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल आहेत. तर संध्याकाळी उशिरा कोरोना बाधित निष्पन्न झालेल्या रुग्णाचा अधिक तपशील समजू शकला नाही.
कोरोनाच्या दररोजच्या संघर्षात जशी कराड तालुक्यातील बाधितांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे, तसाच कराडचा रिकव्हरी रेटही चांगला राहिला आहे. तालुक्यातील बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली असली तरी साठपेक्षा अधिक रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. पण उर्वरित जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा वेग कमी आहे. या पाश्र्वभूमीवर आज सातारा जिल्हा रूग्णालयाला जणू कोरोनामुक्तीची लॉटरीच लागली. येथील तब्बल आठ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
या आठ कोरोनामुक्तांसह जिल्ह्यातील डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या १०६ वर गेली आहे. त्याचबरोबर कोरोनाबळींची संख्या ४ झाली आहे. आज रुग्णालयातून घरी सोडलेल्या रूग्णांमध्ये फलटण तालुक्यातील तरडगाव येथील ६७ वर्षीय महिला व ६ वर्षाचा मुलगा, फलटण येथील ३३ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील १३ वर्षांची मुलगी, सातारा तालुक्यातील कोडोली येथील १८ वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील २३ वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथील ३६ वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा १८ वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अद्यापतरी आटोक्यात असल्यामुळे जिल्हा रेड झोनमधून नॉन रेड झोनमध्ये बदलण्यात आला असून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जवळपास दोन महिन्याच्या खंडानंतर 'प्रवाशांच्या सेवेसाठी' जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. ६५ वर्षांवरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे असे या आदेशात म्हटले आहे.
या आदेशानुसार सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा व इतर हॉस्पिटॅलिटी सेवा बंद राहतील. फक्त या सेवा आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विषयक काम करणारे कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, कामगार व क्वारंटाईन सुविधा चालवणाऱ्या ठिकाणी यांच्यासाठी या सेवा सुरू राहतील. तथापि, रेस्टॉरंटना त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येतील. सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार्स अँड ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल, मंगल कार्यालये हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे, मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद राहतील. इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडीयम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शारीरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस (दुचाकी वाहनावर १ चालक, तीनचाकीवर १ चालक व २ व्यक्ती, चार चाकी वाहनात १ चालक व २ व्यक्ती) परवानगी राहील. सर्व मार्केट व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता या वेळेमध्ये सुरू राहतील. गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे. लोकांचा वावर असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रूपये दंड आकारण्यात येईल. कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास १ हजार रूपये दंड आकारण्यात येईल. अंत्यविधी व लग्न समारंभ या कार्यक्रक्रमध्ये ५० पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुकानात प्रत्येक ग्राहकात किमान ६ फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |