04:36pm | Jan 23, 2021 |
कराड: शासनाची पूर्वपरवागनी न घेता तसेच चालू बाजारभावाने 50 टक्के मूल्यांकन न भरता करण्यात आलेल्या कुळजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य कुळ जमीन खरेदी - विक्री व्यवहारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रथमदर्शनी कराड तालुक्यातील 59 जणांना कूळ कायद्याप्रमाणे जमीन प्राप्त झाली असल्याची माहिती उपलब्ध आहे. जमीन प्राप्त झाल्यानंतर 59 जणांनी सदरची जमीन शासनाची परवानगी न घेताच इतरांना खरेदी दिली. अशा व्यवहारात विक्री करत असताना शासनाला बाजारभावाने 50 टक्के होणारी मूल्यांकनाची रक्कम भरावी लागते. ती रक्कम न भरता असे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. त्यांच्या विरोधात महसूल विभागाने जोरदारपणे मोहीम सुरू केली आहे.
4 प्रकरणांमध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम प्रमाणे शासन जमा करण्यात आले आहे. रघुनाथ आत्माराम जाधव, नांदगाव (या.कराड) यांच्याकडे असणारे वेगवेगळ्या चार गटाच्या जमिनीच्या चालू बाजार भावाने 50 टक्के होणारे मूल्यांकन महसूल विभागाने भरून घेतले आहे. एकूण 2 लाख हजार 140 रुपये शासकीय खजिन्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत 12 लाख 81 हजार 640 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 84 (क) एकूण 65 प्रकरणे कराड महसूल विभागात दाखल आहेत. सदर प्रकरणापैकी 6 प्रकरणांमध्ये चालू आर्थिक वर्षात 10 लाख 74 हजार 500 रुपये एवढी रक्कम महसूल विभागाने वसूल करून शासनाकडे जमा करण्यात आली आहे. एकूण 59 प्रकरणांमध्ये सदरची कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |