वाई : किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आजपर्यंत ११५ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या शुक्रवार (दि 1 एप्रिल) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या सर्वाधिक अर्ज दाखल होतील अशी शक्यता आहे.
ऊस उत्पादक मतदार संघ कवठे खंडाळा भुईंज, वाई- बावधन - जावली, सातारा, कोरेगाव या ऊस उत्पादक गटातून व अनुसूचित जाती जमाती राखीव, महिला राखीव गटातून आजअखेर ११५ अर्ज दाखल झाले आहेत.
या कारखानाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. संचालक मंडळातील २१ जागांसाठी येत्या ३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २८ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी गट निहाय भरलेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे : कवठे खंडाळा (१०), भुईंज (२४), बावधन (११), सातारा (२२), कोरेगाव (३०) अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती राखीव (७), महिला राखीव (५) इतर मागास प्रवर्ग (४) आणि विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मधून (२) असे ११५ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी दिली.
आज सर्वाधिक अर्ज कोरेगाव भुईंज आणि सातारा ऊस उत्पादक गटातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. मतदार संघातून आज एकही अर्ज दाखल झाला नाही. यामध्ये शशिकांत मदनराव पिसाळ, दिलीप पिसाळ, प्रताप यादव, संदीप पोळ, सुभाष घाडगे, जयवंत पवार, दिलीप शिंदे, मधुकर शिंदे, दीपक बाबर, ज्ञानोबा शिंगटे, रवींद्र इथापे, सतीश निकम, सुरेश जाधव, दादासाहेब शिंदे, संजय गायकवाड, चंद्रसेन शिंदे, रत्नदीप कदम, जयदीप शिंदे, प्रदीप भोसले, प्रकाश परामणे, अमृत शिंदे, चंद्रकांत फडतरे, दत्तू शिंदे, चंद्रकांत इंगवले, सुनील जाधव, अरविंद कदम, अमर करंजे, आनंदराव जाधव, भुजंगराव जाधव, सदाशिव बागल, बाळासाहेब येवले, ज्ञानू डोंगरे, चंद्रहास पाटील, महेश पाटील, श्रीकांत भोईटे, सचिन साळुंखे, नंदकुमार निकम, विजय चव्हाण, संतोष निंबाळकर, मेघराज भोईटे, प्रदीप फाळके, बाळासाहेब भोईटे, नवनाथ केंजळे, अमोल निकम, श्रीरंग भोईटे, दिपक केंजळे, अशोक जाधव, अरुण जाधव, दीपाली भिसे, संजय कांबळे, उषा कांबळे, विजया साबळे, वंदना भिलारे, रोहिणी राजेनिंबाळकर, तेजश्री जाधव, कल्पना कदम, अशोक जाधव, विठ्ठल गायकवाड, अरविंद कोरडे, लालसिंग जमदाडे, लक्ष्मण दरगुडे, अमर करंजे आदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व आमदार मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशासकीय इमारत व येथे मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शुक्रवार (दि १) अखेरचा दिवस असल्याने सत्तारूढ व विरोधी पॅनलमधील इच्छुक उमेदवारीची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |