03:48pm | Apr 07, 2021 |
सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा शहरासह जिल्ह्यात अंशत: लॉकडाउन सुरू केले. अत्यावश्यक बाबींशिवाय अन्य सर्वच बाबींना प्रतिबंध केल्यामुळे मद्यप्रेमींना घाम फुटला होता. मात्र बुधवारी मद्यप्रेमींना दिलासादायक ठरणारी बातमी दिसून आली. सातार्यातील परमिट रूमवरील लॉकडाउन उठवत प्रशासनाने त्यांना दिलासा दिला. दरम्यान, या घटनेमुळे परमिट रुम ला नक्की आशिर्वाद कोणाचा? असा प्रश्न मद्यप्रेमींमधून उपस्थित होत आहे.
‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’, अशी परिस्थिती सातार्यात दिसून येत आहे. गतवर्षी मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर करत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. वॉईन शॉप, बिअर बार, परमीट रूम सर्व पूर्णपणे लॉक ठेवण्यात आली होती. त्यामुळे मद्याला सोनाचा भाव आला होता. मिळेल तिथून, मिळेल ती, मिळेल त्या किंमतीत मद्यप्रेमी मद्य उपलब्ध करून घेत होते. मद्य न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील काहींनी सॅनिटायझर पिऊन मृत्यू ओढवून घेतला होता. तब्बल 6 महिने हा खेळ सुरू होता.
13 महिन्यांनी जिल्ह्यात पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनावर पुन्हा एकदा अंशत: लॉकडाऊन करण्याची वेळ आली. प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांसह सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि प्रेक्षागृहे, मनोरंजन पार्क, आर्केड्स, व्हिडीओ गेम्स पार्लर, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, सर्व धर्मीय धार्मिक व प्रार्थना स्थळे, सर्व केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर्स, वाईन शॉप, परमीट रूम कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले. त्यामुळे विशेषत: मद्यप्रेमींना धक्का बसला.
प्रशासनाने हॉटेलमध्ये (लॉजिंग) राहण्यासाठी असलेल्या प्रवाशांसाठीच हॉटेलमधील रेस्टॉरंट आणि बार सुरू राहतील, असे आदेश दिले असले तरी तळीरामांना ही गोष्ट परवडणारी नव्हती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मद्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. 140 रूपयांची एक बाटली 350 रूपयांच्या घरात गेल्यामुळे तळीरामांना चांगलाच घाम फुटला होता. मात्र व्यसनाधीन झालेल्या तळीरामांजवळ अन्य पर्याय नव्हता. अशातच बुधवारी त्यांना दिलासा देणारी घटना घडली. सातारा शहरातील जवळपास सर्वच परमीट रूम उघडले असल्याचे चित्र दिसून आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जावून माहिती घेतली असता प्रशासनाने परमीट रूम सुरू करण्यास परवानगी दिली असून केवळ पार्सल देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संबंधित चालकाने दिली.
याबाबत मद्यप्रेमींनीच प्रश्न उपस्थित केले आहेत. ते असे : वाईन शॉपपेक्षा परमिट रुममध्ये अतीशय कमी प्रमाणात मद्याची विक्री होते. त्यामुळे मद्यविक्री दुकानांचा महसूल हा परमिट रुमपेक्षा कितीतरी पट अधिक प्रशासनाला मिळत असतो. दुसरी बाब म्हणजे वाईन शॉपमध्ये जेवढ्या किंमतीला बाटली मिळते, त्यापेक्षा 70-80 रुपये चढ्या भावाने ती परमिट रुममध्ये विकली जाते. या लॉक डाऊनमध्ये परमिट रुममध्ये बसण्याची अथवा फुकट पाण्याचीही सोय नाही, तर तिथून फक्त बाटली पार्सल मिळणार आहे. मग काहीही कारण नसताना परमिट रुम मालकाला मोठे करण्यामागे आशिर्वाद नक्की कोणाचे? परमिट रुम मधील बाटली नक्कीच सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे ज्यादाच्या पैशाची तजवीज करण्यासाठी मद्यप्रेमी भरकटण्याचा संभव नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा आपल्या या आदेशाचा विचार करावा, अशी मद्यप्रेमींनी मागणी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |