08:48pm | Oct 04, 2022 |
फलटण : गत दोन-तीन वर्षांपासून सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांना नौदलात भरती करतो, असे सांगून असंख्य युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन देखील उजळमाथ्याने फिरणाऱ्या बोगस नौदल अधिकारी ठकसेन आकाश डांगेच्या पापाचा घडा अखेर भरला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाने त्याची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुण्यात जावून आकाश डांगेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भारतीय नौदल तसेच सैन्य दलात नोकरी लावतो, असे सांगून आकाश डांगे याने राज्यभरातील शेकडो युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. काही युवकांनी फसवणुकीतून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आकाश डांगे याच्या विरोधात तक्रारी आल्यावर गुन्हे दाखल आहेत. नौदल अधिकाऱ्याचा गणवेश घालून नौदल अधिकारी असल्याचे भासवत तो तक्रारी दाखल झाल्यावर देखील उजळमाथ्याने फिरत आणखी कांड करतच होता. दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी त्याची पत्नी ऋषिका डांगे हिने त्याच्या विरोधात त्याने तिची व तिच्या कुटुंबियांची फसवणूक करुन लग्न केल्याची तक्रार दाखल केल्यावर देखील त्याच्यावर पोलीस कारवाईस विलंब होत होता. गेली काही वर्षे 'सातारा टुडे'ने डांगेच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर आणून त्याचा बुरखा फाडला होता. पोलीस पाठीशी घालत असल्याने तो अद्याप मोकाट फिरत असल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. डांगेला पाठीशी घालण्यात येत असल्याने तो शेकडो युवकांच्या भविष्याची राखरांगोळी करुन सध्या पत्नीने त्याच्यावर तक्रार दाखल केली म्हणून तिला व तिच्या कुटुंबियांना त्रास देत असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
या महाठकास पोलीस अटक कधी करणार, असा सवाल फलटण तालुक्यासह राज्यभरातील फसवणूक झालेल्या युवकांसह त्यांच्या पालकांना पडलेला असताना दि. 3 सप्टेंबर रोजी आदित्य संदीप यादव वय 22, रा. शिंदेवाडी खुंटे, ता. फलटण या युवकाने त्याची आकाश डांगेने तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या युवकाला बारावीनंतर एनडीए मध्ये भरती होण्याची इच्छा होती. अशातच 2020 साली त्या युवकाच्या मावस भावाच्या ओळखीतून आकाश काशीनाथ डांगे रा. भाडळी बुद्रूक, ता. फलटण याच्या बरोबर फलटण येथील हॉटेल गॅलेक्सि येथे भेट झाली. त्यावेळी आकाश डांगे याने आदित्य व त्याच्या मावस भावाला तुम्ही मला 10 लाख रुपये द्या, मी तुम्हाला नेव्हीमध्ये भरती करुन देतो. माझी नेव्हीच्या कार्यालयात ओळख असल्याने परीक्षा देण्याची गरज नाही व मेडीकल फिट करुन देतो, असे सांगितले.
मार्च 2020 मध्ये आकाश डांगेने तक्रारदार युवक आदित्य यादव व त्याचे वडील संदीप यादव यांना भेटण्यास बोलावले. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून भरतीसाठी लागणारी कागदपत्रेही घेतली. त्यावेळी पाच लाख रुपये अगोदर द्या व भरतीनंतर उर्वरित 5 लाख रुपये द्या, असे सांगितले. आदित्यच्या वडिलांनी सोसायटीचे कर्ज काढून शिंदेवाडी खुंटे येथे आकाश डांगे याला 5 लाख रुपये दिले. पैसे दिल्यावर डांगेने आदित्यला नेव्हीचे जॉयनिंग लेटर व ट्रेनिंग ॲडमिट कार्ड देवून 13 मार्च 2020 रोजी चिल्का ओरिसा येथे ट्रेनिंगला हजर राहण्यास सांगितले होते. तसेच सुरवडी येथील हॉटेल निसर्गवर बोलवून सोबत आणलेल्या स्कॅनिंग मशीनवर अंगठ्याचे ठसेही घेतले होते व उर्वरित 5 लाख रुपये देण्यास सांगितले होते.
त्यानंतर आदित्य यादव याच्या वडिलांनी पाहुण्यांकडून उसने पैसे घेतले व आकाश डांगे याला घरी बोलावून 5 लाख रुपये दिले होते. त्यावेळी 10 दिवसांनी चिल्का येथील गेटपास देतो, असे सांगितले. मात्र, त्याचवेळी आकाश डांगे याला इंदापूर पोलिसांनी अटक केली असल्याचे समजले. काही दिवसांनी जामिनावर सुटून आल्यावर यादव यांनी डांगेकडे पैसे मागितले असता तुमचे काम झाले आहे. काळजी करु नका, असे डांगेने सांगितले. मात्र, त्यानंतर अनेक वेळा आकाश डांगे याला फोन करुनही तो फोन घेत नव्हता. त्याच्या भाडळी येथील घरीही तो नव्हता. त्यानंतर एकदा आकाश डांगे याने भेटून तुमचे पैसे देवून टाकतो, असे म्हटल्याने यादव यांनी तक्रार दाखल केली नव्हती.
सप्टेंबर 2022 मध्ये आकाश डांगे याने बनावट ओळखपत्रे, कागदपत्रे दाखवून फसवणूक केली असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दाखल केली असल्याचे समजल्यावर आमची फसवणूक झाली असल्याचे सिध्द झाले. तसेच माझ्या दोन मित्रांची देखील आकाश डांगेने फसवणूक केली असल्याचे समजले. त्यामुळे दि. 3 रोजी मी आकाश डांगे याच्या विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आमची 10 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल करत असल्याचे आदित्य संदीप यादव यांनी खबरी जबाबात म्हटले आहे.
आकाश डांगेच्या पुण्यात आवळल्या मुसक्या
वास्तविक आकाश डांगेवर त्याच्या पत्नीने फसवणुकीची तक्रार दाखल केल्यावर त्याला अटक होईल, अशी चर्चा फलटण तालुक्यात होती. मात्र, पोलिसांनी नोटीस पाठवून अटकेची कारवाई केलेली नव्हती. त्यानंतर आकाश डांगे हा त्याच्या पत्नीला तक्रार मागे घेण्यासाठी त्रास देत होता. मेव्हण्यावर खोटा गुन्हा दाखल करुन त्याच्या पत्नी व तिच्या कुटुंबियांवर दबाव आणत असतानाच दि. 3 रोजी 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी आकाश डांगेचा शोध सुरु केला. पोलीस पथकाने पुण्यात जावून आकाश डांगेच्या मुसक्या आवळून त्याला फलटणमध्ये आणले. न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्यभरात होणार अनेक गुन्हे दाखल
आकाश डांगे गेल्या तीन-चार वर्षांपासून बोगस सैन्य भरतीत गुंतला होता. त्याने सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील शेकडो युवकांची फसवणूक केली होती. त्यात काही पोलीस ठाण्यात कारवाई झाल्यावर जामिनावर सुटून तो वाळू तस्करीतही सक्रीय झाला होता. त्याने स्वत:ची टोळी बनवून आणखी कांड करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांकडून अभय मिळत असल्याने त्याची शिरजोरी चांगलीच वाढली होती. आता फलटण पोलीस ठाण्यात अटकेची कारवाई झाल्यावर आता राज्यभरात तक्रारी दाखल होतील, अशी चर्चा फलटण तालुक्यात सुरु असून आता डांगेच्या पापाचा घडा भरला असून त्याच्या अटकेची वार्ता फलटण तालुक्यात मोठी चर्चेचा विषय बनली आहे.
साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात होणार शेकडो गुन्हे दाखल
आकाश डांगे याने गत दोन-तीन वर्षात नौदल, भारतीय सैन्य दलात भरती करतो, म्हणून शेकडो युवकांची फसवणूक केली आहे. यामध्ये राज्यभराबरोबरच साताऱ्यासह सांगली, कोल्हापूरमधील युवकांचा समावेश आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक युवकांना सैन्यात जाण्याची ओढ असते. देशसेवा करतानाच आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचे स्वप्न घेवून हे युवक भरतीसाठी प्रयत्न करत असतात. नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा घेत आकाश डांगेने असंख्य युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन अनेक ठिकाणी स्थावर, जंगम मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. आता सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये डांगेवर शेकडो गुन्हे दाखल असून त्याची राज्यभरात वरात काढावी लागणार आहे.
सख्ख्या मेव्हण्यावर हनी ट्रॅप
आकाश डांगे याने त्याची पत्नी ऋषिका व तिच्या कुटुंबियांना खोटी कागदपत्रे व गणवेशातील फोटो दाखवून तो नेव्हीत असल्याचे भासवले. मात्र, लग्नानंतर त्याचे पितळ उघडे पडल्यावर खुद्द पत्नी ऋषिका हिनेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाश डांगेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हेगारी प्रवृतीचा असलेल्या आकाश डांगेने सासुरवाडीच्या लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली असून खुद्द सख्ख्या मेव्हण्याला हनी ट्रॅपमध्ये गुंतवले. एका मॉडेलला हाताशी धरुन त्याने हा प्रकार केला असून त्या मॉडेलला मेव्हण्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करायला लावले आहे. या प्रकरणात सध्या त्याने मेव्हण्याला खोटा गुन्हा दाखल करुन अडकवले असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी डांगेच्या पत्नीने पोलिसांकडे केली असल्याचेही समोर येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |