फलटण : फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साखरवाडी येथे चंदाबाई बाळु जाधव ही महिला गांजाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने स्वतः स्वाती धोंगडे यांनी सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव, पोलीस नाईक रूपाली भिसे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड, गणेश अवघडे यांचे पथक तयार केले. पथकाने वेषांतर करून मिळालेल्या माहितीची खातरजमा करत असताना साखरवाडी येथील आंबेडकर नगर येथे चंदाबाई बाळू जाधव ही महिला राहत्या घराच्या आडोशाला गांजाची विक्री करत असताना आढळून आली. त्या महिलेकडून ६१ हजार ५०० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. चंदाबाई जाधव हिच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या बारा वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे साखरवाडी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसला असुन सर्व अवैध धंदे बंद झाले आहेत. तरी कोणात्याही व्यक्तीस अवैध धंद्याबाबत माहिती मिळताच संपर्क क्र. ९७५२६८२२००२१६६- २२२५३३ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवणेत येईल, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या सूचनेवरून फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |