मेढा : भैरवनाथ युवा क्रीडा मंडळाचे जेष्ठ सल्लागार, महात्मा गांधी वाचनालयाचे सर्वेसर्वा, आदर्श शिक्षक मेढा गावचे सुपुत्र शामराव क्षीरसागर गुरुजी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
एक अभ्यासू तत्त्वचिंतक, उत्तम वक्ता, चोखंदळ वाचक, प्रभावी सूत्रसंचालक, उमदा नाट्यकलाकार, उत्कृष्ट संघटक, वाचन संस्कृतीचा चालक अशा कितीतरी भूमिका लीलया सांभाळणारे शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
शिक्षकीपेशा बरोबरच अनेक सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा सहभाग होता. महात्मा गांधी वाचनालयामध्ये ग्रंथपाल ते अध्यक्ष असे गेले 51 वर्ष ग्रंथालय चळवळीत काम केले. वाचनालयाच्या भरभराटीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा ग्रंथालयाचे संचालक म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केले. जावली तालुका ग्रंथालय संघाचे स्थापने मध्येही त्यांचा पुढाकार होता. आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार, आदर्श जिल्हा ग्रंथालयीन कार्यकर्ता पुरस्कार, महात्मा गांधी वाचनालयाचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांच्या कार्याची पोहोच पावती देतात. काही वर्षापूर्वीच केंद्र प्रमुख म्हणून पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |