09:29pm | Aug 17, 2021 |
फलटण : जिंती येथून एका तरुणाचे तीन अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली होती. या अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाला असून मृतदेह होळ येथे एका शेतात सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.
फलटण ग्रामिण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जिंती, ता. फलटण गावचे हददीतुन जिंती पुल येथुन दिनांक 16 रोजी रात्री 9 च्या सुमारास शकील अकबर शेख (वय 21 वर्षे रा. विकासनगर जिंती) व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे (रा. जिंती ता. फलटण) हे दोघे जण त्यांची बजाज बॉक्सर मोटार सायकल (एमएच 11 एस 4434) वर विकासनगर येथून कपडे आणण्यासाठी रणवरे वस्ती जिंती येथे गेले होते. ते कपडे घेवुन परत घरी येत असताना अज्ञात 3 लोकांनी त्यांच्या मोटार सायकलला गाडी आडवी मारुन त्यांना अडवले. शकील यास त्यांच्या मोटार सायकलच्या मधल्या सिटवर बसवून त्याची मोटार सायकल घेवून शकील यास अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळवून नेले होते. याबाबत खुशी शकील शेख (वय 22 वर्षे रा. जिंती ता.फलटण) यांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्याचा पोलिस तपास करीत असताना दि. 17 रोजी होळ, ता. फलटण गावचे हददीत आपटे यांचे शेतामध्ये अपहृत शकील अकबर शेख हा तरुण मयत स्थितीत आढळून आला. शकील यास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी पळवुन नेवुन त्याचा खुन केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली असून या गुन्ह्याच्या अनुशंगाने एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पोलिस उप निरीक्षक उस्मान शेख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |