11:21am | Oct 18, 2020 |
ठाणे : गोवा येथून हलक्या प्रतीचे मद्य आणून हे मद्य स्कॉचच्या बाटल्यांमध्ये भरून जादा किंमतीत विकणाऱ्या रॅकेटचा उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील नेरूळ येथून मद्यसाठा असलेल्या कारसह एकाला ताब्यात घेतल्यानंतर ज्या ठिकाणी हा गैरप्रकार सुरू होता, त्या सानपाड्यातील सेक्टर १ येथील गोदामावर पथकाने छापा टाकला. या कारवाईत विदेशी मद्याच्या ५९६ सिलबंद बाटल्यांसह बनावट स्कॉचच्या ९३ बाटल्या, तसेच बनावट लेबल आणि कार असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कमी मेहनतीत झटपट श्रीमंत होण्यासाठी आरोपी मद्यप्रेमींच्या जीवाशी खेळत होते, अशी माहिती भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांनी दिली.
नेरूळमधील सेक्टर ६ मध्ये बनावट स्कॉच या विदेशी मद्याची विक्री होणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांचे आदेश आणि संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, दिपक परब यांच्या पथकाने सापळा रचून कारमधून ५४ सिलबंद बाटल्यांसह एकूण ६ लाख ७८ हजार ९० रुपायांचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब पुढे आली. सानपाडा येथील सेक्टर १ मध्ये सोसायटीमध्ये असलेल्या गोदामात हलक्या प्रतीच्या परराज्यातील विदेशी मद्यापासून उच्च प्रतीची बनावट स्कॉच तयार करण्याचा व्यवसाय केला जात होता. या माहितीनंतर तात्काळ पथकाने याठिकाणी छापा टाकत विविध ब्रँडचे लेबल्स, रिकाम्या बाटल्या, ड्रायर मशीन, बुच, मद्यसाठा जप्त केला. येथून जप्त केलेल्या मुद्देमालाची किमंत ७ लाख २४ हजार आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिबीन दिनेश तियर याला अटक करण्यात आल्याची माहिती निरीक्षक संताजी लाड यांनी दिली. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य एक आरोपी फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. मागील एक वर्षापासून हा व्यवसाय सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी मद्यसेवन करणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होते, असेही लाड यांचे म्हणणे आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |