08:35pm | Jan 18, 2022 |
कराड : किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला.
या दुर्गार्पण सोहळ्यासाठी गडावर जमलेल्या शेकडो दुर्गसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, हर हर महादेवच्या गर्जना आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने संपूर्ण वसंतगड दणाणून टाकला. तसेच दुर्गसेवकांनी भंडाऱ्याची उधळण करत संकल्पपूर्तीचा आनंदोत्सवही साजरा केला.
दरम्यान, रविवारी १६ रोजी सकाळी श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर तुतारीच्या निनादात व हलगीच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढून शिवरायांच्या मूर्तीला गडावरील कृष्णा व कोयना तळ्यातील पाण्याने अभिषेक घालण्यात आला. त्याचबरोबर गडाच्या पश्चिम दरवाजात पालखी आल्यानंतर उपस्थित शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व दुर्गसेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई तुळजा भवानीचा जयजयकार केला. तसेच दरवाजाच्या डाव्या बुरुजासह तटबंदीवर असलेल्या मावळ्यांनी महाराजांच्या पालखीवर भांडाऱ्याची उधळण करत मल्हारीचा येळकोट केला. भंडाऱ्याच्या उधळणीत किल्ले वसंतगड अक्षरशः न्हाऊन निघाला होता. यावेळी गडावरील वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते.
गेले दीड-दोन वर्षांपासून वसंतगडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवक मावळ्यांनी बुरुजाचे टनभर वजनाचे पाषाण बांधकामस्थळी नेेणे, पुरातत्व खात्याच्या निकषांनुसार संपूर्ण बांधकाम चुन्यात पूर्ण करणे, त्यासाठी शिवकालीन दगडी चुन्याचा घाना सुरू करून त्यामध्ये चुन्याची मळणी करणे, त्या मिश्रणासाठी लागणारे सगळे साहित्य तटबंदीपर्यंत वाहून आणणे, लोकसहभाग व देणगी स्वरूपात स्वराज्य निधी उभारणे आदी. दिव्य पार पडणाऱ्या सर्व मावळ्यांचा या सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |