09:47pm | Jan 18, 2022 |
कराड : काही दिवसांपूर्वीच कराडचे तहसीलदार विजय पवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांचीही टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये दोन नायब तहसीलदारांसह चार कर्मचारीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच पालिकेच्या कर विभागातील अन्य चार कर्मचार्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कराडकरांमध्ये चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसात कराड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंबातील कोणालाही थोडीही शंका आल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी नागरिकांना केले आहे.
तसेच सध्या पॉझिटिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढत असली. तरीही त्याची तीव्रता कमी आहे. शासनाने सध्या गृहविलगीकरणाचा कालावधी ७ दिवसाचा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून नये. तसेच न घाबरून न जाता नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियम, निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांमध्ये शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत असून टेस्ट वाढवण्यावर प्रशासनाने भर दिल्याचे दिसून येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |