09:39pm | Dec 04, 2020 |
वाई : सोनगिरवाडी (वाई) येथील एका पस्तिस वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तीचे अश्लील छायाचित्र घेऊन ते फोटो समाज माध्यमांवर प्रसारीत केल्या प्रकरणी सागर तुकाराम सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) याला वाई पोलीसांनी अटक केली आहे.
संबंधित पिडीत महिला सोनगिरवाडी येथे आपल्या कुटूंबियांसह राहते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवर आपले अकौंटवर सागर सोनवलकर याच्याशी त्यांची मैत्री झाली. त्यातून दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. त्यातुंन त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. तुम्ही मला खूप आवडता मी तुम्हाला सुखात ठेवेन, असे सांगितले. त्यानंतर सोनवलकर यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगून त्याचे फोटो काढले. त्यानंतर अश्लील फोटोची मागणी केली. त्याच्याकडून वारंवार मागणी वाढू लागल्याने महिलेने त्याचा क्रमांक ब्लॉक केला. त्याचा राग मनात धरून सोनवलकर याने महिलेच्या अकौंटवरील अश्लील छायाचित्र पिडीतेच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर व समाज माध्यमामावर प्रसारीत करून व त्यांची बदनामी केली. संबंधित महिलेची बदनामी करत तसेच मुलींचे लग्न होऊन देणार नाही, अशी धमकी दिली. संबंधित पिडीतेने याप्रकरणी सोनवलकर याच्या त्रासाला कंटाळून वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत. पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कलमाखाली सोनवलकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |