02:46pm | Sep 27, 2022 |
सातारा : राज्यभरात असणाऱ्या धनगर वाड्यांमधील समाज बांधवांच्या अनेक समस्या आहेत. प्रशासनाची लालफीत आणि राजकीय उदासीनता यामुळे समाज बांधवांची फार मोठ्या प्रमाणावर कुचंबांना होत आहे. ठोसेघर, ता. सातारा येथील मालदेववस्तीत वास्तव्य करणाऱ्या धनगर समाजासाठी स्मशानभूमीला वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने विरोध केल्याची माहिती प्राप्त होत आहे. हा विरोध म्हणजे एक पशुवृत्तीच असुन मालदेव वस्ती येथे स्मशानभूमी होण्यासाठी प्रसंगी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली तरी ती घेतली जाईल अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी 'सातारा टुडे'शी बोलताना दिली.
मंगळवारी 'सातारा टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तामध्ये परळी, ता. सातारा येथील वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने ठोसेघर, ता. सातारा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मालदेववस्ती येथील धनगर समाज बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्मशानभुमीला परळी बीटमधील एका कर्मचाऱ्यने संबंधित जागा वन विभागाच्या मालकीची असल्याचे सांगत बांधकाम बंद पाडले याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर प्रवीण काकडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रवीण काकडे म्हणाले, भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. देशाने अमृत महोत्सव साजरा केला. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र काही विरोधाभासही पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील धनगर वाड्यांचा पाहणी दौरा केला असता अनेक भीषण वास्तव समोर आले. अनेक ठिकाणी धनगर समाज बांधव मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. काही ठिकाणी त्यांना पिण्याचे पाणी तर काही ठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ते अडवले आहेत. अनेक गावांमध्ये तर धनगर समाज बांधवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच उपलब्ध नाही. बहुजन व धनगर समाजाला मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ठेवण्याचे पाप प्रस्थापित राजकीय पक्ष आणि लाल फीत करत आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
देशामध्ये संविधान आणि कायदे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र संवेदनशीलता महत्वाची नाही का असा प्रश्न उपस्थित करत ठोसेघर ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या मालदेव वस्ती परिसरामध्ये धनगर समाज बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीला विरोध करणे म्हणजे ती एक प्रकारची पशुवृत्तीचा आहे. अशा प्रकारच्या घटनांचा आम्ही सर्व धनगर समाज बांधव कडाडून निषेध व्यक्त करीत असून येत्या काही दिवसांमध्ये याबाबत राज्याचे राज्यकर्ते, सातारा जिल्हा प्रशासन यांच्या भेटी घेऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. मालदेव वस्ती परिसरात धनगर समाज बांधवांसाठी होणाऱ्या स्मशानभूमीला कोणी विरोध केल्यास प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
धड जगु देत नाही..... शांतपणे मरू तरी द्या : संजय शेडगे
देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्षे पूर्ण झाली तरी धनगर समाज बांधवांना अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आम्हाला प्रत्येक वेळी आमचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हाला धड जगू देत नाही शांतपणे मरूत्री द्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार विभाग ठोसेघर (सातारा) चे अध्यक्ष संजय शेडगे यांनी व्यक्त केली.
वन विभागाने केवळ कायद्यावर बोट न ठेवता माणुसकी दाखवावी
ते म्हणाले, मालदेव वस्ती ही दुर्गम समजली जाते. या ठिकाणी जाण्यासाठी डांबरी रस्ता, एस.टी. बस अशी कोणतीही सुविधा नाही. या वस्तीमध्ये धनगर समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शेती आणि पशु, शेळ्या-मेंढ्या पालन याच्यावर ते आपल्या कुटुंबाची गुजरण करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना सर्वांसाठीच वंदनीय आहे. आम्ही धनगर समाज बांधव राज्य घटनेचा खूप आदर करतो. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र कायदा आणि संवेदनशीलता याची सांगड घालत अनेक कामे मार्गी लागू शकतात. आज मालदेव वस्ती येथे धनगर समाज बांधवांसाठी स्मशानभूमी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाने केवळ कायद्यावर बोट न ठेवता संवेदनशीलता दाखवत माणुसकी दाखवत विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमीला परवानगी द्यावी, अशी मागणी संजय शेडगे यांनी केली.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |