02:54pm | May 22, 2022 |
लोणंद : नुकत्याच झालेल्या लोणंद नगर पंचायत निवडणूकीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये चुरशीच्या लढतीत मा. ग्रां. प.सदस्य व लोणंद शिवसेना नेते विश्वास अण्णा शिरतोडे व भरत बोडरे यांना समान मतदान होवून चिठ्ठीवर भरत बोडरे विजयी झाले होते. परंतु या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात केवळ दोनच अपत्य असल्याचे नमूद करून भरत बोडरे यांनी मतदारांची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार विश्वास अण्णा शिरतोडे यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भरत बोडरे हे लोणंद नगर पंचायत निवडणूक २०२२ मध्ये चिठ्ठीवर विजयी झाले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविता येत नाही व या संदर्भात खोटे शपथपत्र दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊन उमेदवार अपात्र ठरविला जातो. याची माहिती असतानाही भरत बोडरे यांनी समाधान भरत बोडारे जन्म दिनांक ०३/०६/२००३ व संदीप भरत बोडरे जन्म दिनांक २९/०९/२००४ एवढ्याच दोन मुलांची माहिती निवडणूक अर्जासोबत दाखल शपथ पत्रात निवडणूक अधिकारी यांना दिली होती. या खोट्या शपथ पत्राचे आधारे निवडणूक लढविण्यास पात्र होऊन समान मतदानामुळे चिठ्ठीवर विजयी झाले होते. परंतु नंतर प्रतिस्पर्धी उमेदवार विश्वास शिरतोडे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून भरत बोडरे यांचा तिसरा मुलगा अक्षय भरत बोडरे जन्म दिनांक ३०/११/२००५ याचा ग्राम पंचायत केंजळ येथील जन्म मृत्यू रजिस्टर मधील नोंदणी क्रमांक २ अन्वये दिनांक १८/१०/२०१२ रोजी नोंद असलेला जन्माचा दाखला मिळविला. यानुसार भरत बोडरे यांनी दाखल केलेले शपथपात्र खोटे असल्याचं निदर्शनास आले.
केवळ निवडणुकीकरिता स्वतःचे अपत्य नाकारण्याचा घृणास्पद प्रकार लोणंद नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात झालेल्या तक्रारीने उघडकीस आला आहे. त्यामुळे भरत बोडरे यांच्यावर खोटेशपथ पत्र दाखल केल्याप्रकरणी भा. द. वि.१९९, २००, २०२, २०३, ४२०, ४६८, ४७० प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्वास शिरतोडे यांनी गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस अधिक्षक सातारा, स.पो. नि.लोणंद पोलिस ठाणे यांच्याकडे तक्रारी द्वारे केल्याने लोणंद राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. यानंतर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |