08:47pm | Jan 24, 2023 |
सातारा : भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या वाढे गावातील बंगल्याच्या परिसरात पुरून ठेवलेल्या स्त्रीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सातारा तालुका पोलिसांची बेड्या ठोकल्या.
विकास हिरामण सकट वय 38, रा. कलेढोण, तालुका खटाव सध्या राहणार फुलेनगर, तालुका वाई असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 4 जानेवारी रोजी सातारा तालुका पोलिसांना वाढे गावच्या हद्दीत माजी आमदार कांता नलावडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागे अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पोलिसांनी कौशल्याने तपास करून पटवली. मंगल शिवाजी शिंदे वय 50, राहणार संगम माहुली असे त्या महिलेचे नाव होते. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरु ठेवला होता. सदरचा आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे पोलिसांच्या हातात येत नव्हता. वेगवेगळ्या पथकाद्वारे पुणे, मुंबई तसेच लगतच्या जिल्ह्यामध्ये सातारा पोलिसांनी जोरदार तपास केला.
दिनांक 23 जानेवारी रोजी विश्वजीत घोडके यांना संबंधित आरोपी हा पुण्यामध्ये लपून बसला आहे, अशी माहिती मिळाली. घोडके यांनी पोलिसांचे एक पथक तात्काळ पुण्याला रवाना करून आरोपीला पुण्यात अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक दळवी, हवालदार संदीप आवळे, निलेश जाधव, मालोजी चव्हाण, नीतीराज थोरात, राहुल राऊत, सचिन पिसाळ, गिरीश रेड्डी यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल सातारा तालुका पोलिसांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |